Mumbai : खचाखच भरलेल्या विरार लोकलमध्ये चढणं सोपं
मुंबई उपनगरी रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीची समजल्या जाणाऱ्या विरार धीम्या लोकलमध्ये मालाड (Malad Station) येथे चढणे-उतरणे आता अधिक सुलभ होणार आहे. पश्चिम रेल्वेने (Mumbai Local) मालाड स्थानकातील नव्या पोलादी फलाटाचे काम पूर्ण केले असून हा फलाट प्रवाशांच्या वापरासाठी खुला झाला आहे. यामुळे मालाड स्थानकात फलाटांवरील गर्दी विभागण्यास मदत होणार असून, धीम्या लोकलच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.