• Sun. Jun 14th, 2026

    ढगाळ-दमट हवा, पुणेकरांवर कीटक धाड; रस्ते-बाग-पुलांवर थवेच्या थवे, किती दिवस सांभाळायला हवे?

    ढगाळ-दमट हवा, पुणेकरांवर कीटक धाड; रस्ते-बाग-पुलांवर थवेच्या थवे, किती दिवस सांभाळायला हवे?

    Pune News : शहरातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून मोठे बदल झाले आहेत. दिवसभर ढगाळ आणि दमट हवा आहे, त्यामुळे जमिनीखाली वसाहती (कॉलनी) करून राहणाऱ्या वाळवी बाहेर आल्या आहेत

    महाराष्ट्र टाइम्स

    पुणे : मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांच्या काही भागात (Pune News) बुधवारी संध्याकाळी अचानक आलेल्या कीटकांच्या धाडीमुळे (Termite) पुणेकर वैतागले. अनेक दुचाकीस्वारांना या कीटकांनी हैराण केले. रस्त्यावरील दिव्यांखाली, नदीवरील पुलांवर हजारोंच्या संख्येने हे कीटक उडताना दिसले.

    ‘शहरात सध्या थव्याने उडणारे हे कीटक वाळवी असून, सध्या त्यांचा मिलनाचा काळ असल्याने ते बाहेर पडले आहेत. काळजी करू नका; नागरिकांना त्यांचा धोका नाही,’ असे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

    कशामुळे किटकांची धाड

    ‘शहरातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून मोठे बदल झाले आहेत. दिवसभर ढगाळ आणि दमट हवा आहे, त्यामुळे जमिनीखाली वसाहती (कॉलनी) करून राहणाऱ्या वाळवी बाहेर आल्या आहेत. सध्याचे हवामान त्यांच्या मिलनासाठी पोषक असल्याने मोठ्या संख्येने ते हवेत उडताना दिसत आहेत.’ अशी माहिती ज्येष्ठ जीवशास्त्र अभ्यासक डॉ. हेमंत घाटे यांनी दिली.

    ‘पुढील दोन-तीन दिवस नदी काठ, रहिवासी क्षेत्र, उद्यानांसह मोकळ्या जागा असलेल्या भागांमध्ये हे कीटक मोठ्या संख्येने बघायला मिळतील. त्यानंतर ते दिसणार नाहीत,’ अशी माहितीही डॉ. हेमंत घाटे यांनी दिली.
    Crime News : विद्यार्थिनीच्या वडिलांना शिक्षिकेने जाळ्यात ओढलं, व्हिडिओ कॉलही झाले, शेवटी मॅडमनी…

    मोकळ्या जमिनींखाली वास्तव्य

    ‘हे कीटक प्रामुख्याने शहरातील मोकळ्या जमिनींखाली कॉलनी करून राहतात. तापमान वाढ झाल्याने पाऊस पडल्यानंतर हवा अचानक दमट होते. हाच त्यांचा मिलनाचा काळ असतो. या काळात हे कीटक जमिनीतून बाहेर पडून आकाशात मुक्त विहार करतात. पथदिवे, भिंतीवर लावलेल्या दिव्यांकडे ते आकर्षित होतात. या काळात पालींनाही पिल्ले झालेली असतात. या कीटकांच्या रूपाने पालींसह इतर सर्व कीटकभक्षी प्राण्यांना मुबलक खाद्य मिळते.’
    Solapur Crime : हर्ष, माऊ सॉरी बरं का! लेकरांची माफी मागत बापाने आयुष्य संपवलं, त्याच जागेवर ७२ तासांनी आईने प्राण सोडले
    ‘ही नैसर्गिक प्रक्रिया असून, ती आवश्यक आहे. मात्र, अलीकडे शहरातील मोकळ्या जागा काँक्रिट, पेव्हर ब्लॉकने झाकल्यामुळे या कीटकांची वसतिस्थाने कमी झाली आहेत,’ असे डॉ. घाटे यांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *