• Mon. Apr 21st, 2025 12:43:59 PM

    Accident News : येरवडा जेलकडे जाताना उड्डाणपुलावर अचानक काहीतरी अंगावर पडलं, सगळ्यांनी दाबले ब्रेक… पुण्यात काय घडलं?

    Accident News : येरवडा जेलकडे जाताना उड्डाणपुलावर अचानक काहीतरी अंगावर पडलं, सगळ्यांनी दाबले ब्रेक… पुण्यात काय घडलं?

    Pune Yerawada Accident News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येरवडा जेल रस्त्याकडे जात असताना उड्डाणपुलावर एक विचित्र घटना वाहनचालकांसोबत घडली. सर्व वाहनचालकांनी ब्रेक दाबले आणि एकच गोंधळ उडाला, नेमकं काय घडलं जाणून घ्या

    महाराष्ट्र टाइम्स
    पुणे धक्कादायक अपघात

    म.टा. प्रतिनिधी, येरवडा : येरवडा (Yerawada News) येथील गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना खेळाडूने मारलेला चेंडू थेट बाहेरील उड्डाणपुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाच्या छातीवर लागला. त्यानंतर चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांवर आदळला. यामुळे अनेक वाहनांनी अचानक ब्रेक मारला. यामुळे पुलावर वाहनचालकांचा मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, संबंधित तरुणाने येरवडा पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार अर्ज दाखल केला; पण पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.

    या प्रकरणी ३२ वर्षीय तरुणाने गोल्फ क्लब प्रशासनाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुण आणि त्याचा मित्र दुचाकीवरून शनिवारी सायंकाळी पाच वाजता गुंजन चौकातून उड्डाणपुलावरून जेल रस्त्याकडे जात होते. साधारण पाच वाजून दहा मिनिटांनी उड्डाणपूल उतरत असताना डावीकडून वेगाने गोल्फचा पांढऱ्या रंगाचा चेंडू मैदानातून पुलाच्या दिशेने आला आणि तरुणाच्या छातीवर आदळला. त्यानंतर चेंडू उड्डाणपुलावरून जाणाऱ्या अनेक वाहनांच्या काचेवर आदळला. या दरम्यान चेंडू लागलेल्या तरुणाने चेंडू घेऊन येरवडा पोलिस ठाणे गाठले आणि पोलिस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी तरुणाला तक्रार अर्ज देण्यास सांगितले. तरुणाने तक्रार अर्ज दाखल करून दोन दिवस झाले तरीही अद्याप यावर काहीही कार्यवाही झाली नाही.

    यापूर्वी गोल्फ क्लब कोर्सच्या सीमाभिंतीवरून अतिवेगाने येणारा चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या तोंडावर लागल्याचा प्रकार २९ नोव्हेंवर २०२३ रोजी घडला होता. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पूना क्लब गोल्फ कोर्सचे व्यवस्थापन आणि गोल्फ खेळणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, यानंतरही असे प्रकार घडत असल्याने येथील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    ‘शनिवारी सायंकाळी उड्डाणपुलावरून येताना गोल्फ कोर्स मैदानातून अतिवेगाने चेंडू येऊन माझ्या छातीला जोरात लागला. शिकाऊ खेळाडूंच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या निष्पाप लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे गोल्फ क्लब कोर्स प्रशासनावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे,’ अशी मागणी जखमी तरुणाने केली आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed