Nitin Gadkari : मराठी माणूस भारतीय राजकारणात सर्वोच्च स्थानी का पोहोचू शकत नाही? नितीन गडकरींना गाडगीळांचा प्रश्न
‘सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांनी गेली अनेक वर्षे जगभरातील विविध क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती घेतल्या. मात्र कधी समोरच्याला कमी लेखून फौजदारी वकिलासारखे प्रश्न विचारले नाहीत. अत्यंत शिताफीने समोरच्याकडून नेमके काढून घेण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. ते रक्ताचा एक थेंबही न निघू देता ऑपरेशन करतात,’ असे प्रशंसोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ज्येष्ठ मुलाखतकार, लेखक सुधीर गाडगीळ यांच्याविषयी काढले. गाडगीळ यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात गडकरी बोलत होते. ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गडकरी आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभात गडकरी यांनी गाडगीळ यांच्या सुसंवादशैलीचे कौतुक केले.