• Tue. Apr 22nd, 2025 1:36:08 AM
    भूमिगत मेट्रोच्या गाड्या धूळखात, ९ पैकी ६ गाड्या कारशेडमध्ये; अत्यल्प प्रवाशांमुळे मर्यादित वापर

    Line 3 Mumbai Metro : भूमिगत मेट्रोच्या गाड्यांचा अत्यल्प प्रवाशांमुळे मर्यादित वापर होत असून या भूमिगत मेट्रोच्या गाड्या धूळखात उभ्या असल्याचं चित्र आहे. ९ पैकी ६ गाड्या कारशेडमध्येच असल्याचं दिसतं.

    महाराष्ट्र टाइम्स

    चिन्मय काळे, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटामाटात सुरू झालेल्या बहुचर्चित भूमिगत मेट्रोच्या गाड्या आरे कारशेडमध्ये धूळखात उभ्या असल्याचे चित्र आहे. अत्यल्प प्रवासी संख्येमुळे मयादित गाड्यांचाच वापर होत असल्याने उर्वरित गाडया तशाच उभ्या आहेत.

    मेट्रो ३ ही देशातील १०० टक्के व राज्यातील सर्वाधिक लांबीची मेट्रो मार्गिका आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे जेव्हीएलआर ते वांद्रे कुर्ला संकूल (बीकेसी) असा दहा स्थानकांचा आणि १२.९९ किमी लांबीचा आहे. त्याचेच उद्‌द्घाटन पंतप्रधानांनी ५ ऑक्टोबर २०२४ ला केले होते. या टप्प्यात सीप्झ, एमआयडीसी, विमानतळाचे दोन्ही टर्मिनल यांचा समावेश आहे. तसे असतानाही मार्गिकेवर प्रवासी संख्या अपेक्षेपेक्षा नाममात्र आहे.

    मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात दररोज दोन लाख प्रवाशांची ये-जा असेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सध्या मार्गिकेवरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या जेमतेम २० हजारांच्या घरात आहे. त्यामुळेच सर्व गाड्यांचा वापर होत नसल्याची स्थिती आहे. पहिल्या टप्प्यासाठी मागवण्यात आलेल्या एकूण नऊ गाड्यांपैकी अवघ्या तीन गाड्या वापरात आहेत. त्यातही दोनच गाड्या दररोज प्रत्यक्ष सेवेत आहेत. तिसरी गाडी’ स्टँडबाय’ असते. मात्र परिणामी सहा गाड्या आरे येथील कारशेडमध्ये तशाच धूळखात उभ्या असल्याचे आरे जेव्हीएलआर स्थानकावार गेल्यानंतर स्पष्ट दिसून येत आहे.
    कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रोचा आणखी एक मार्ग अंतिम टप्प्यात, बीकेसी ते वरळी मेट्रो कधी सुरू होणार?
    ही मार्गिका केंद्र आणि राज्य सरकारच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) या संयुक्त कंपनीकडून चालवली जाते. नेमक्या किती गाड्या दररोज चालवल्या जातात, याबाबत विचारले असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही

    एका गाडीचा खर्च ५५२ कोटी

    ही मार्गिका दोन टप्प्यांत सुरू होणार आहे. त्यालील दुसरा टप्पा धारावी ते आचार्य अत्रे चौक असा असेल. तर, अखेरचा टप्पा तिथून कफ परेडपर्यंत असेल. या तिन्ही टप्प्यांसाठी मिळून एमएमआरसीने प्रत्येकी आठ डब्ब्यांच्या ४२ गाड्यांची ऑर्डर फ्रान्सच्या अलस्टॉम कंपनीला दिली होती. त्यापैकी २३ हजार २०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यानुसार एक गाडी सरासरी ५५२ कोटी रुपयांची आहे. त्यातील नऊ गाड्या पहिल्या टप्प्यासाठी मुंबईत दाखल असून त्यातील ३३१४ कोटी रुपयांच्या सहा गाड्या वापराविना कारशेडमध्येच आहेत.
    कल्याण-तळोजा, दहिसर पूर्व- मीरा-भाईंदर… ठाणे-भिवंडी-कल्याण, कुठे, कोणत्या मार्गावर धावणार मेट्रो

    Underground Metro : भूमिगत मेट्रोच्या गाड्या धूळखात, नऊपैकी सहा गाड्या कारशेडमध्येच; अत्यल्प प्रवाशांमुळे मर्यादित वापर

    मेट्रो ३ चा एकूण खर्च ३७ हजार कोटी

    या मार्गिकचा एकूण खर्च ३० हजार कोटी रुपये आहे. त्यातील पहिला टप्पा १४ हजार १२० कोटी रुपयाचा आहे. त्यात गाड्यांचा खर्च ५ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed