शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार संजय राऊत यांनी दाव्यात म्हटले की पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात राजीनाम्यासाठी गेले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळला. राज ठाकरे यांच्या मुद्द्यावर फडणवीसांनी मशिदींवरील भोंगे आणि औरंगजेबाच्या कबरीबाबत भूमिका स्पष्ट केली.
मोदीजींच्या उत्तराधिकारी शोधण्याचे कुठलेही कारण नाही मोदीचे आमचे नेते आहेत. पुढे अनेक वर्ष मोदीजी काम करणार आहेत. आणि पूर्ण देश 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडे बघतो आहे. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांच्या विचार होत नाही आणि करायचा ही नसतो ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुले अशी विचार करतात त्यामुळे कोणीही कोणताही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही आणि त्याचा प्रश्नही नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे त्याच्या माझ्याशी संबंधही नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर सरकारचा स्पष्ट निर्णय
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “जो काही नियमांच्या बाहेर आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होत असेल, तर त्या आदेशाचे तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल.”
औरंगजेबाच्या कबरीवर सरकारची भूमिका स्पष्ट
राज ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असल्याने ती अबाधित ठेवावी, अशी मागणी केली होती. यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, “या कबरीला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षण आहे. त्यामुळे आमचा आणि औरंगजेबाचा आवड-नावड याचा काहीही संबंध नाही. पण सरकार कोणत्याही परिस्थितीत या कबरीचे उदात्तीकरण ग्लोरिफिकेशन होऊ देणार नाही.”