Sanjay Raut on Raj Thckaeray : मनसे नेते राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात शिवाजी पार्क मैदानावर बोलताना सत्ताधारी पक्षांवर टीका केली. राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी काम करण्याचं आश्वासन दिलं होतं. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना सरकारवर तिखट शब्दांत निशाणा साधला.
लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती, भाजपच्या सोईची होती. मराठी माणसासंदर्भात कानफटात आवाज काढायचा असेल तर काढायलाच पाहिजे. कोणत्या पक्षाचा नेता भूमिका मांडतोय त्याच्याविषयी आमच्या मनात कधीही संदेह असणार नाही. मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाचं संघटन भाजपने तोडलं हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा सर्वात मोठा हल्ला आहे. शिवसेना फोडण्यामागे नरेंद्र मोदी. अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे. मुंबईवरती व्यापाऱ्यांचा ताबा राहावा यासाठी राजकारण झालं, राज ठाकरे त्यांना पाठिंबा देऊ इच्छितात त्यांच राजकारण आहे. आम्ही सगळे मराठी माणसाच्या प्रगतीसाठी काम करत आहोत. त्यामुळे त्यांना मदत होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.राज ठाकरे म्हणाले औरंगजेबाची कबर राहूद्या, फडणवीस म्हणतात, काहीही झालं तरी…
राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाने एका मेळाव्यामध्ये केलेले भाषण आहे. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर विश्लेषण केले पाहिजे असं नाही. नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले, संघाने गुलमीच्या बेड्या तोडल्या हा शोध कोणी लावला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचं काय योगदान आहे याच्यावर सगळ्यांनी आमच्याकडून ब्रीफिंग घेतलं पाहिजे. १५० वर्षे देश गुलामांच्या बेडीत अडकला होता. महात्मा गांधींपासून पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, वीर बहाद्दर, सरदार पटेल, भगतसिंह आणि वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्त्वाखाली लढा झाला तेव्हा बेड्या तुटल्या. मोदी म्हणतात तो संघ कुठे नव्हता, लोकांसमोर खोटा इतिहास ठेवणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत देशाच्या जनतेची माणसिकत सुधारणार नाही. एखाद्या दिवशी वेड्यांचा खोटारड्यांचा देश म्हणून यादीमध्ये यायचा, असं म्हणत राऊतांनी कोपरखळी लगावली.