• Sat. Mar 7th, 2026
    ‘लागली बत्ती पार्श्वभागाला की…’, Sandeep Deshpande यांची आशिष शेलारांवर खोचक कविता

    Sandeep Deshpande Poem on Ashish Shelar : “एकच प्रश्न गेले अनेक दिवस आपण बघतोय, काही लोकं जाणीवपूर्व राज ठाकरे यांच्याबद्दल बोलत असतात. विचित्रपणे बोलत असतात. त्यांना फक्त एकच इशारा देतो. त्यासाठी एक कविता केली आहे. ती कविता बोलून दाखवतो आणि माझे दोन शब्द संपवतो”, असं संदीप देशपांडे आपल्या भाषणात म्हणाले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज दादर येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर कवितेच्या माध्यमातून खोचक शब्दांत निशाणा साधला. “लागली बत्ती पार्श्वभागाला की, येतो शिवतिर्थीवर चहा प्यायला. वांद्रेतून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. मुखवटा घालून फिरतो. मीच तुमचा मित्र खरा. पण कपटी मित्रापेत्रा दिलदार शत्रूच बरा. स्वत:ला समजतो. मुंबईचा मामा शेलार. पण सगळ्या मुंबईला माहिती आहे, हाच आहे मुंबईचा आशिष झोलार”, असा घणाघात संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर कवितेतून केला.

    “सध्या आपण गेले तीन-चार महिने आपण बघतोय, मुंबई शहराची ज्या पद्धतीने बकाल अवस्था झाली आहे, माझे सर्व सहकारी यशवंत किल्लेदार, योगेश सावंत यांनी मांडली. कशापद्धतीची अवस्था झाली आहे, कशा पद्धतीने रस्ते खोदले गेले आहेत, नालेसफाईचा प्रश्न नाही, महापालिकेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला दिसतेय. काही परप्रांतीयांची दादागिरीदेखील आपल्याला वाढताना दिसतेय”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

    ‘हमने काम करने का तरिका बदला हैं, हमारे तेवर नहीं बदले’

    “परवाच कुठल्यातरी दुकानात मी मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचं ते करुन घ्या, अशा पद्धतीची भाषा वापरणारे काही लोकं होते. कल्याणला मराठी माणसाला मारहाण करणारी काही लोकं होती. काही सोसायट्यांमध्ये जाणीवपूर्वक मराठी माणसांवर दादागिरी करणारी काही लोकं आहेत. मला त्यांना एकच सांगायचं आहे. त्यांच्या भाषेत समजेल, अशाच भाषेत सांगतोय, हमने काम करने का तरिका बदला हैं, हमारे तेवर नहीं बदले, हे लक्षात ठेवा”, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
    ‘Devendra Fadnavis आमचा पाठिंबा निश्चित राहील, पण…’, Raj Thackeray यांचं सूचक वक्तव्य
    “मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की, ज्या पद्धतीने रस्ते खोदून ठेवले आहेत, खड्ड्यात बसवून बसवून एकेकाला मारु. मग बोलू नका. मनसैनिकाच्या नादाला नाही लागायचं. कुणीतरी येतं, घाटकोपरची जागा गुजराती आहे म्हणतं. महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे”, असं संदीप देशपांडे यांनी ठणकावून सांगितलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed