• Thu. Apr 10th, 2025 10:17:42 AM
    शेतकऱ्यांनो, पीक कर्जाचे पैसे भरा! अजित पवारांनी डेडलाईन सांगितली; भलीमोठी यादीच वाचली

    Ajit Pawar: सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पैसे ३१ तारखेच्या आत भरा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते.

    Lipi

    – दीपक पडकर

    बारामती: सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पैसे ३१ तारखेच्या आत भरा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ कार्यालय येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

    महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो की, पीक कर्जाचे पैसे ३१ तारखेच्या आत भरा. जे काही सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही, असं अजित पवार म्हणाले. ‘७ लाख २० कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना, जवळपास ६५ हजार कोटी रुपये, वीज माफी, लाडकी बहीण योजना, ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. तसेच साडेतीन लाख कोटी रुपये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्व स्टाफचे पगार, पेन्शन तसेच घेतलेल्या कर्जाचे व्याज ४ लाख १५ हजार कोटी यासाठीच जातात. राहिलेल्या पैशातून शाळा, गणवेश, पुस्तके, हॉस्टेल, रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा व इतर खर्च यासाठी खर्च करावा लागतो. ही बाब लक्षात घेतली पाहिजे,’ अशी लांबलचक यादी वाचत अजित पवारांनी पीक कर्जाचे पैसे भरण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
    CM फडणवीसांच्या काकूच सरकारवर नाराज; रस्त्यावर उतरण्याचा इशारा; शोभा फडणवीस का संतापल्या?
    माझ्यासारखा आमदार तुम्हाला मिळूच शकणार नाही.!
    ‘बारामतीकरांनो मी तुम्हाला अधिकारवाणीने सांगतो. बारामती दूध संघाला आता १५ कोटी दिले. आणि नवीन आर्थिक वर्षात २५ कोटी देणार आहे. ४० कोटींचा पशुखाद्य कारखाना उभा करत आहोत. यात एक पैसाही दूध संघाचा नाही. ७८ सालापासून दूध संघ चालू आहे. याआधी कधी असं झालंय का? मार्केट कमिटीसाठी ६० कोटी एवढा निधी राज्यातल्या कुठल्या कमिटीकडे आलाय का? हे येड्यागबाळ्याचे काम नाही. बाकीचे जे आत्ता मिरवत आहेत, त्यांचा घास नाही, असं म्हणत माझ्यासारखा दुसरा आमदार तुम्हाला मिळूच शकणार नाही. माझं काम बोलतं,’ असे म्हणत अजित पवारांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

    मी हे सर्व का करू शकतो तर की तुम्ही माझ्या मागे लाखापेक्षा जास्त मतांनी उभे आहात, उभे राहिलात. त्यामुळे माझे मनच मला सांगते की, पुन्हा लाखापेक्षा जास्त मतं दिलीत. त्यातून उतराई व्हावे लागेल. म्हणून हे काम मी करत असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed