कादंबरीकार विश्वास पाटील यांचे राजकारण्यांना खडे बोल
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे हिंदू म्हणून जन्माला आले आणि त्यांनी हिंदू धर्माचा उद्धार व गौरव केला; पण त्याबरोबरच त्यांनी अखंड मानवधर्मातून सर्व जाती-धर्माच्या लोकांना आपले मानले. हे दोन्ही राजे तेव्हाच मानवतेच्या महामंदिरामध्ये जाऊन विराजमान झाले. मात्र, आजचे सर्व राजकीय पक्ष आणि राजकारणी त्यांना निवडणुकीच्या आणि मतदानाच्या बाजारामध्ये खेचून उभे करीत आहेत,’ या शब्दांत कादंबरीकार विश्वास पाटील यांनी राजकारण्यांना गुरुवारी खडे बोल सुनावले.