Chhatrapati Sambhajinagar : भर उन्हात पाणीबाणी, शहरात पाणीपुरवठा ठप्प, नागरिकांचे हाल
आठ दिवसांनी कसे-बसे व कमी-अधिक मिळणारे हक्काचे पाणी अद्याप मिळालेले नसल्याने अनेक वस्त्यांमध्ये गेल्या चार दिवसांत टँकरवाऱ्या कमालीच्या वाढल्या आहेत. त्यामुळे उल्कानगरी, गारखेडा, शहानूरवाडी, रामतारा हौसिंग सोयायटी, चाणक्यपुरी, क्लाऊड नाईन अशा सोसायट्यांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत धडाधड टँकर सुरू झाले आहेत. बहुतेक कॉलन्यांमधील निम्म्यापेक्षा जास्त घरांमध्ये किमान एकदा तरी टँकर घ्यावा लागल्याचे दिसून येत आहे.