• Fri. Mar 6th, 2026

    Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गौतमी पाटील हिचं कौतुक, ‘सहा महिन्यांपासून प्रयत्न करतोय, पण…’

    Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गौतमी पाटील हिचं कौतुक, ‘सहा महिन्यांपासून प्रयत्न करतोय, पण…’

    Jitendra Awhad on Gautami Patil : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गौतमी पाटील हिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. “तुझ्या सारख्या तरुण तारका ज्यांच्यामागे कुटुंब व्यवस्था नाही, ज्यांच्यामागे जात नाही, अशा पोरींनीच स्टेजवर येऊन त्याचा कब्जा केला पाहिजे”, असं गौतमी पाटील म्हणाली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डान्सर गौतमी पाटील हिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे गौतमी पाटील आपल्या कार्यक्रमाला यावी यासाठी आपण सहा महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. पण गौतमी पाटील हिच्यापर्यंत पोहोचणं शक्य झालं नाही, असं देखील जितेंद्र आव्हाड भर कार्यक्रमात म्हणाले. “बाकी काहीही असो, पण गौतमीने चांगल्या चांगल्यांना झोपवून स्वत:चं जे नाव केलं त्याबद्दल ती मला खूप आवडते. तिच्या नृत्याबद्दल मला काही बोलायचं नाही. महाराष्ट्रातील प्रस्थापित वर्गाचा या महाराष्ट्रावर जो या नाच-गाण्यावर पगडा होता त्याला या पोरीने पहिल्यांदा धक्का दिला”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

    “जेव्हा गौतमीबद्दल चर्चा केली गेली, आमच्या विधानसभेत चर्चा झाली, अनेक जणांनी तिच्या विषयी काही बोललं, तेव्हा मला आठवतं मी पहिला माणूस होतो ज्याने उघडपणाने सांगितलं की, एका गरीब घरातील पोरगी स्वत:च्या अदाकारीवर स्टेजवर पकड मिळवत असेल तर तिच्या मागे उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
    Sujay Vikhe Patil : ‘माझंदेखील राजकीय पुनर्वसन करा’, सुजय विखेंची भर कार्यक्रमात मागणी

    ‘पण तेव्हा ती विसरली की…’

    “गौतमीच्या पाठीमागे पहिल्यांदा मी उभा राहिलो. आता ती मोठ्या मोठ्यांच्या मागे उभी राहते. पण तेव्हा ती विसरली की, तेव्हा तिच्यामागे कुणी मोठं उभं राहिलं नव्हतं. तिला काय गरज आहे कुणाच्या मागे उभं राहायचं? मोठी पुढे येऊन स्टेटमेंट देते. मला कुणाचं नाव घ्यायचं नाही. पण तुझं काम असंच चालू ठेव”, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
    Raj Thackeray यांनी बाह्या सरसावल्या, मनसेच्या इतिहासातील सर्वात मोठे बदल

    ‘मी गौतमीला आणण्यासाठी सहा महिन्यांपासून प्रयत्न करतोय’

    “महाराष्ट्रात लोकांना तू आवडतेस. मला वाटतं की, तुझ्या सारख्या तरुण तारका ज्यांच्यामागे कुटुंब व्यवस्था नाही, ज्यांच्यामागे जात नाही, अशा पोरींनीच स्टेजवर येऊन त्याचा कब्जा केला पाहिजे. तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल. तुझं मनापासून अभिनंदन. आयोजक अन्नूचं सुद्धा अभिनंदन. त्याची चालते यार. मी गौतमीला आणण्यासाठी सहा महिन्यांपासून प्रयत्न करतोय. माझ्या कार्यक्रमाला आली नाही, अन्नूच्या कार्यक्रमाला आली. बघा अन्नूची किती चालते. हिला बघण्यासाठी मला अन्नूकडे यावं लागलं”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed