• Sun. Aug 16th, 2026
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस रविवारी नाशिकमध्ये; सिंहस्थासंदर्भात घेणार आढावा बैठक

Devendra Fadnavis Nashik Daura: २०२६-२७ होणाऱ्या सिंहस्थासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दोन बैठकी घेतल्यानंतर आता नाशिकमध्ये येऊन ते सिंहस्थाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
devendra fadnavis news.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सन २०२६-२७ होणाऱ्या सिंहस्थासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दोन बैठकी घेतल्यानंतर आता नाशिकमध्ये येऊन ते सिंहस्थाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

येत्या रविवारी (दि. २३) मुख्यमंत्री फडणवीस नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील तयारीबाबतचा आढावा घेण्यासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या नाशिकच्या दौऱ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, सिंहस्थ आढावा बैठकीला नाशिकचे खासदार आणि आमदारांनाही निमंत्रित केले जाणार असल्याचे समजते.

नाशिक- त्र्यंबकेश्वरमधील आगामी सिंहस्थाबाबत प्रशासकीय पातळीवरून जोरदार तयारी सुरू आहे. महापालिकेचा सिंहस्थ आराखडा आता सात हजार ७६७ कोटींपर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम, पोलिस विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा, नाशिक विकास प्राधिकरणासह विविध विभागांनीही साडेसात हजार कोटींचा आराखडा सिंहस्थासाठी तयार केला आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी महापालिकेसह सर्व विभागांचा आराखडा पंधरा हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे.

परिणामी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी महाकुंभासंदर्भात मुंबईत बोलावलेल्या या बैठकीत या आराखड्याची माहिती घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोनवेळा मुंबईत बैठक घेऊन सिंहस्थाच्या कामांसंदर्भात तयारीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता रविवारी मुख्यमंत्री फडणवीस नाशिकमध्ये येऊन सिंहस्थाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थासंदर्भात यापूर्वी दिलेल्या आदेशांची काय अंमलबजावणी झाली आदींचा ते आढावा घेणार आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.आणखी वाचा

हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सा
Central Railway : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण अन् उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना फटका; महत्त्वाच्या तीन गाड्या बंद, अडचणींचं कारण पुढे
रश्मी शुक्लांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने पुन्हा बुचकळ्यात टाकलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed