• Sun. Aug 16th, 2026

रश्मी शुक्लांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने पुन्हा बुचकळ्यात टाकलं

Milind Narvekar on Rashmi Shukla : महाविकास आघाडीचं सरकार खिळखिळं करण्यात ज्यांचा मोठा हातभार असल्याचे आरोप होता, त्यांनाच ठाकरेंचे विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर यांनी वारंवार शुभेच्छा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : एकीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नऊपैकी सहा लोकसभा खासदारांना आपल्या गळाला लावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वीरित्या राबवून दाखवलं आहे. अशातच ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी पुन्हा एकदा नेटिझन्सना बुचकळ्यात टाकलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असताना केंद्रस्थानी असलेल्या ठाकरेसेनेच्या बड्या नेत्यानेच समर्थकांना गोंधळात टाकलं आहे.

मिलिंद नार्वेकर यांचं ट्वीट काय?

महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा देणारी पोस्ट मिलिंद नार्वेकर यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर ऐन स्वातंत्र्यदिनी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी केली होती. ‘महाराष्ट्र लोकायुक्त सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) श्रीमती रश्मी शुक्ला जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या या नवीन जबाबदारीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.’ असे लिहित मिलिंद नार्वेकरांनी त्यांचा फोटोही शेअर केला आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीही नार्वेकरांनी शुक्ला यांना शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती. ‘माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!’ असे त्यावेळी नार्वेकरांनी लिहिले होते. आधी निवडीसाठी अभिनंदन आणि आता शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन, यावरुन नेटिझन्सनी मिलिंद नार्वेकर यांना सवाल विचारले आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार खिळखिळं करण्यात ज्यांचा मोठा हातभार असल्याचे आरोप होता, त्यांनाच ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा नेता शुभेच्छा देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Maharashtra TimesAditi Tatkare : ‘लेक लाडकी’ योजनेची अर्जप्रक्रिया सुलभ, 18 वर्षात 1 लाख 1 हजाराचा लाभ, ऑनलाईन फॉर्मबाबत आदिती तटकरेंची माहितीविरोधीपक्षात असतानाही मिलिंद नार्वेकर यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना शुभेच्छा देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत अनेक मोठमोठ्या नेत्यांना नार्वेकरांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या आहेत.

नार्वेकर-जाधव वादाचा तडका

काही काळापूर्वी मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी गाडीचा हॉर्न वाजत असल्याने ‘नार्वेकर कोण लागून गेला?’ असा प्रश्न विचारणारे जाधव चर्चेत आले होते.

Maharashtra TimesPune News : 38 व्या वर्षी 11.5 कोटींची संपत्ती, पुण्यातील DINK जोडप्याचा निवृत्तीचा विचार, नेटिझन्सची तोंडात बोटं, नोकरीमुळे तब्येती बिघडल्यात्यावर व्यक्त होताना नार्वेकरांनी ‘फ्रस्ट्रेशन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे’ असे ट्वीटमध्ये केले होते.