Congress Worker accuses NCP MLA Nitin Pawar : विधानसभा निवडणुकीत आमदार पवार व त्यांची पत्नी जयश्री यांच्याविरोधात काम केल्यामुळे शीतल यांच्या पतीविरुद्ध खोट्या तक्रारी करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप आहे
काय आहे प्रकरण?
शीतल यांचे बंधू योगेश गायकवाड यांनी याबाबत तक्रार दिली आहे. महाजन यांचे पती ग्रामसवेक असून, त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवण्यात येत असल्यामुळे शीतल यांना मानसिक त्रास होत आहे.
विधानसभा निवडणुकीत आमदार पवार व त्यांची पत्नी जयश्री यांच्याविरोधात काम केल्यामुळे शीतल यांच्या पतीविरुद्ध खोट्या तक्रारी करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु, चौकशीत काहीच आढळले नाही. आमदारांकडून त्रास सुरूच असल्याने शीतल यांनी विषारी औषध घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आमदार पवार आणि पत्नी जयश्रीविरोधात तक्रार करूनही पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
Satish Wagh : अनैतिक संबंधात अडसर, आमदाराच्या मामाचा काटा काढण्यापूर्वी जादूटोणा, मोहिनी मामी मांत्रिकाकडे गेली, अक्षयने…
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी चिठ्ठी
आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या आधी शीतल महाजन यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी आमदार नितीन पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार नितीन पवार आणि जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे ग्रामसेवक असलेल्या पतीला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी चिठ्ठीतून केला होता. पतीच्या विरोधात खोट्या तक्रारी करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आमदार करत असल्याचा दावाही महाजन यांनी चिठ्ठीत केला आहे. मात्र अनेक वेळा चौकशी होऊनही त्यांच्या तक्रारीत तथ्य आढळलेले नाही. तरीही त्रास सुरुच असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
Car Accident : पार्टनरशिपमध्ये जिम, एकाची १५ दिवसाची लेक, दुसऱ्याची बायको प्रेग्नंट, पुण्यातील सख्ख्या मित्रांचा एकत्रच अपघाती मृत्यू
आमदार नितीन पवारांची प्रतिक्रिया
‘संबंधित महिलेच्या पतीविरोधात माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने मी लक्षवेधी लावली होती. ती स्वीकारायची की नाही, हा अध्यक्षांचा अधिकार असून, अद्याप पटलावर आलेली नाही. संबंधित महिलेबद्दल मला काही माहिती नाही’, अशी प्रतिक्रिया आमदार नितीन पवार यांनी दिली.

