• Wed. Apr 23rd, 2025 12:57:03 AM
    महामार्गावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, कंटेनर थेट पुलावरुन कोसळला अन्…

    Pune Accident News : महामार्गांना आता अपघातांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. अपघाताला अनेक लोक बळी ठरत आहेत. यातच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघालेला मालवाहू कंटेनर उलटल्याने भीषण अपघात घडला आहे.

    Lipi

    दीपक पडकर, पुणे : महामार्गांना आता अपघातांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. अपघाताला अनेक लोक बळी ठरत आहेत. यातचपुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघालेला मालवाहू कंटेनर उलटल्याने भीषण अपघात घडला आहे. मदनवाडी चौफुला (ता. इंदापुर) येथे आज सकाळी सहाच्या सुमारास चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर थेट वीस ते पंचवीस फूट उंचीच्या पुलावरुन खाली कोसळला. अपघात एवढा भीषण होता की, कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये कंटनेरचेही प्रचंड नुकसान झाले.

    श्रवणकुमार भगवतीप्रसाद यादव (वय ३७, रा. मुंबई, मुळ उत्तरप्रदेश) असे चालकाचे नाव आहे. भिगवण पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास मदनवाडी चौफुला (ता.इंदापूर) येथे पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघालेल्या कंटेनरचे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नंतर कंटेनर दुभाजकावर जोरात आदळला आणि दुसऱ्या लेनवरून थेट वीस ते पंचवीस फूट खाली सेवा रस्त्यावर कोसळला. सर्व रस्त्यावर वाहतूक अथवा नागरिक नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
    Pune News : देशात घडलं नाही, ते पुण्यात होणार; वाहन चालकांची मोठी कटकट दूर, कोर्टात जाण्याची गरज नाही
    अपघातामध्ये कंटेनर चालक श्रवणकुमार यादव गंभीर जखमी झाला होता. त्यास येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. कंटेनर कोसळलेल्या ठिकाणी नेहमी लोकांची वर्दळ असते. अपघात सकाळच्या वेळी झाल्यामुळे त्या ठिकाणी कोणीही व्यक्ती नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

    रायगडच्या भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. अपघातात बस सुमारे ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात १८ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. शनिवारी दुपारी ४च्या सुमारास हा अपघात घडला असून बस झाडाझुडपांमध्ये अकडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed