Jalgaon Earthquake claim by People : जळगावात बुधवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला. यावेळी जमीन अक्षरश: हादरली. त्यामुळे नागरीक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले. भूकंपामुळे हा सगळा प्रकार घडला असा नागरिकांचा दावा आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वेगळीच माहिती सांगितली आहे.
प्रशासनाची तातडीने दखल
घटनास्थळी स्थानिक प्रशासनाने पाहणी केली आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या माहितीनुसार, भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नाही. त्यामुळे हा आवाज आणि जमिनीत जाणवलेले कंपन भूकंपाशी संबंधित नाही.
“चाळीसगाव तालुक्यात दोन वेळा मोठा आवाज ऐकू आल्याची माहिती मिळाली होती, नागरिकांनी यामुळे भूकंपाचा अंदाज वर्तवला. मात्र, मेरी संस्थेच्या अहवालानुसार भूकंपाची नोंद नाही. तरीही नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.
Sudhir Mungantiwar : ‘धाडस करा, कर्जमुक्तीसाठी काय घाबरता?’, सुधीर मुनगंटीवार यांचे थेट सरकारला सवाल
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणया गूढ आवाजाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. “अचानक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदांसाठी जमिनीला कंपन जाणवलं. आम्ही लगेच घराबाहेर पडलो. हा स्फोटासारखा आवाज नक्की कशामुळे झाला? हे समजत नाही,” असे स्थानिक नागरिकाने सांगितले. दरम्यान, संबंधित घटना ही भूकंप नसल्याने आवाज नेमका का आला आणि जमीन नेमकी कशी हादरली? या प्रश्नाचं उत्तर अद्याप समजू शकलेलं नाही. याबाबत आगामी काळात काही माहिती मिळते का? ते पाहणं महत्त्वाचंं आहे.

