• Tue. Mar 10th, 2026

    HSRP Number Plate चे रजिस्ट्रेशन करत असाल तर ही बातमी एकदा वाचाच

    ByMH LIVE NEWS

    Mar 8, 2025 #e-vehicle, #how to get HSRP, #HSRP apply online, #HSRP appointment booking, #HSRP booking near me, #HSRP deadline, #HSRP for commercial vehicles, #HSRP for four-wheeler, #HSRP for old vehicles, #HSRP for two-wheeler, #HSRP government rule, #HSRP latest update, #HSRP number plate, #HSRP online booking, #HSRP penalties, #HSRP plate benefits, #HSRP plate delivery, #HSRP plate helpline, #HSRP plate installation, #HSRP plate law, #HSRP plate mandatory, #HSRP plate rules, #HSRP plate status, #HSRP plate tracking, #HSRP price in India, #HSRP process explained, #HSRP registration, #HSRP RTO guidelines, #HSRP RTO मार्गदर्शक तत्त्वे, #HSRP vehicle registration, #HSRP website India, #HSRP अंतिम तारीख, #HSRP अपॉइंटमेंट बुकिंग, #HSRP अर्ज प्रक्रिया, #HSRP ऑनलाइन बुकिंग, #HSRP कसे मिळवायचे, #HSRP कायदा, #HSRP किंमत, #HSRP ट्रॅकिंग, #HSRP दंड, #HSRP नंबर प्लेट, #HSRP नवीन अपडेट, #HSRP नियम, #HSRP नोंदणी, #HSRP प्रक्रिया माहिती, #HSRP प्लेट डिलिव्हरी, #HSRP प्लेट नियम, #HSRP प्लेट बसवणे, #HSRP प्लेट स्टेटस, #HSRP फायदे, #HSRP शासकीय नियम, #HSRP हेल्पलाइन, #marathi batamya, #motor vehicle department, #Vehicle, #Vehicle Policy, #vehicle registration, #vehicle theft, #चार चाकी HSRP, #जवळच्या HSRP सेवा, #जुन्या गाडीसाठी HSRP, #दोन चाकी HSRP, #भारतातील HSRP किंमत, #भारतातील HSRP संकेतस्थळ, #मराठी बातम्या, #वाहन नोंदणीसाठी HSRP, #व्यावसायिक वाहनांसाठी HSRP
    HSRP Number Plate चे रजिस्ट्रेशन करत असाल तर ही बातमी एकदा वाचाच

    High Security Registration Plate Update Marathi News : वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी (HSRP) ऑनलाइन नोंदणी करताना सायबरचोरांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. बनावट लिंक, वेबसाइटद्वारे वाहनचालकांची फसवणूक होत असून अधिकृत वेबसाइटवरूनच नोंदणी करावी, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. सहा बनावट वेबसाइटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    एचएसआरपी ऑनलाईन नोंदणी

    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी (HSRP)ऑनलाइन नोंदणी करीत असाल, तर सावधान, पुढे धोका आहे! परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरूनच या नव्या नंबरप्लेटची नोंदणी (HSRP Registeration) करताय ना, याची खात्री करा. ‘एचएसआरपी’च्या ऑनलाइन नोंदणीच्या बहाण्याने सायबरचोरांनी बनावट लिंक, वेबसाइट तयार केल्या आहेत. शुल्काच्या बहाण्याने वाहनचालकांची फसवणूक केली जात असून, याप्रकरणी परिवहन विभागाच्या तक्रारीवरून दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून तसेच वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत, रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाची ओळख समजावी, नंबरप्लेट बदलणे किंवा बनावट तयार करणे यांसारख्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP News) बसविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात १ एप्रिल, २०१९पूर्वीच्या वाहनांना या प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाने ही कार्यवाही सुरू केली आहे.

    राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरटीओ बनावट एचएसआरपीबाबत वाहनधारकांच्या तक्रारी दाखल होत आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात परिवहन आयुक्तालयाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर कारवाई करण्यात येत आहे. सध्या सहा वेबसाइट बनावट असल्याचे दिसून आले आहे. वाहनधारकांनी अधिकृत वेबसाइटवरूनच एचएसआरपीसाठीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असं परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी म्हटलं आहे.

    परिवहन आयुक्तालयाने ‘एचएसआरपी’साठी तीन संस्था, उत्पादकांची नियुक्ती केली आहे. नव्या प्लेटसाठी नोंदणी करता यावी यासाठी संबंधित संस्थांच्या पोर्टलची लिंक ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत अधिकृत संस्थांच्या पोर्टल व्यक्तिरिक्त अन्य बनावट वेबसाइट, लिंक तयार झाली असून, त्याद्वारे वाहनमालकांची फसवणूक सुरू असल्याची बाब या कंपन्यांनी परिवहन आयुक्तालयाच्या निदर्शनास आणून दिली. ही माहिती मिळताच सहायक परिवहन आयुक्तांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. यावरून गुन्हा दाखल करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *