Eknath shinde on Abu azmi : आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगाण गाताना त्याला उत्तम प्रशासक म्हटले. त्यांच्या या विधानानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझमींवर कठोर टीका केली आणि त्यांना थेट देशद्रोहीच म्हटले. यावरून मोठा वाद होताना देखील दिसत आहे.
हेच नाही तर अबू आझमी यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीवरून पुन्हा गदारोळ झाला. कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले. अबू आझमी यांनी केलेल्या विधानानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक होताना दिसले. त्यांनी अबू आझमी यांचा जोरदार समाचार घेतला. त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात ही धर्मवारी संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत केली. यावेळी जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या.
Dhananjay Munde Resigns : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक, म्हणाले, फक्त त्यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही तर…एकनाथ शिंदे म्हणाले की, काल याठिकाणी संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजेच औरंगजेबाचे गोडवे अबू आझमी यांनी गायले. खरं म्हणजे अबू आझमींचा निषेध करायला पाहिजे. मी अबू आझमीचा धिक्कार करतो. यापूर्वीही अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे वक्तव्य केले होते. हा अबू आझमी वेळोवेळी आणि जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करत असतो.
संभाजी महाराज यांनी देशासाठी बलिदान केलं. आपल्या प्राण्यांचे बलिदान केले पण धर्म बदलला नाही. अशा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे अबू आझमी हे देशद्रोही आहेत. म्हणून देशद्रोह्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाहीये. आपण छावा बघा रईस. चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले, नखं काढले, त्यांची जिभ झाटली, त्यांच्या अंगावर मिठ टाकले. चाळीस दिवस त्यांचे हाल केले. त्यांच्यावर अत्याचार केले आणि धर्म बदलण्यास सांगितले, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

