Court Notice to Mahayuti MLAs : न्यायालयाने निवडणूक आयोग तसेच अन्य पक्षकारांची नावे वगळण्याचे आदेश देत केवळ विजयी उमेदवारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. संबंधितांनी या नोटीसवर चार आठवड्यांत उत्तर सादर करणे अपेक्षित आहे.
प्रताप अडसड यांच्याविरुद्ध काँग्रेसचे विरेंद्र जगताप, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके आणि संजय कुटेंविरुद्ध काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांनी या याचिका दाखल केल्यात. या याचिकांमध्ये ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन निवडणूक आयोगाने काढले नाही, निकालानंतर पराभूत उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर १७ दिले जात नाही. व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही, असे आरोप करण्यात आलेत.
Tanaji Sawant : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर तानाजी सावंत वेटिंगवर, आत गेले पण लगेच परतले , काय घडलं?
तीनही याचिकांवर सोमवारी न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणूक आयोग तसेच अन्य पक्षकारांची नावे वगळण्याचे आदेश देत केवळ विजयी उमेदवारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. संबंधितांनी या नोटीसवर चार आठवड्यांत उत्तर सादर करणे अपेक्षित आहे. शेळके आणि वाकेकर यांच्याकडून वकील आकाश मून आणि वकील पवन डहाट तर जगताप यांच्याकडून ऋग्वेद ढोरे यांनी बाजू मांडली.
