Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या विरोधातील प्रबळ पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. आरोपींनी संतोष देशमुखांची अमानुषपणे हत्या करताना फोटो आणि व्हिडीओ काढले होते. ते फोटो सीआयडीच्या हाती लागले आहेत. तसेच आरोपी वाल्मिक कराडचं इतर आरोपींसोबतचं फोवरील संभाषणदेखील समोर आलं आहे.
आरोपींमध्ये नेमकं संभाषण काय? वाचा A टू Z
- सुनील शिंदे – नमस्कार विष्णू भाऊ
- विष्णू चाटे – हॅलो शिंदे साहेब!
- सुनील शिंदे – बोला ना
- विष्णू चाटे – अण्णा बोलणार आहेत
- सुनील शिंदे – हो द्या ना
- विष्णू चाटे – हॅलो
- सुनील शिंदे – द्या द्या
- वाल्मिक कराड – हॅलो
- सुनील शिंदे – नमस्कार अण्णा
- वाल्मिक कराड – अरे ते बंद ठेवा, चालू केलं तर वातावरण गढूळ होऊन बसेल
- सुनील शिंदे – बरं बरं अण्णा
- वाल्मिक कराड – ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं, ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत बंद करा.
- सुनील शिंदे – मी मेसेज देतो बरंका
- वाल्मिक कराड – मेसेज द्या. नाहीतर xxxx
- सुनील शिंदे – बरं अण्णा
- वाल्मिक कराड – ते बंद करा म्हणजे बंद करा
- सुनील शिंदे – बरं अण्णा
- वाल्मिक कराड – झाल्या… निवडणुका झाल्या, मी मोकळा झालोय. आता दोन मिनिटात सगळं बंद करा आणि तुम्ही पण तिथून सुटा
- सुनील शिंदे – हो अण्णा
- वाल्मिक कराड – ते बंद करा सगळं, बाकीचं बंद करुन टाका
- सुनील शिंदे – हो
- वाल्मिक कराड – तुमचं नाटक बंद झाल, बदं करा दोन मिनिटात
- सुनील शिंदे – अण्णा… अण्णा…
- वाल्मिक कराड – सांग रे त्या सुदर्शनला, फत्त मारामारी करु नको म्हणावं शिंदे
- सुनील शिंदे – अण्णा

