• Tue. Jun 16th, 2026
    ही गयीगुजरी लोक, त्यांनी राजकारणात स्वत:चं चांगभलं करुन घेतलं; ठाकरेंचं गोऱ्हेंना प्रत्युत्तर

    Uddhav Thackeray Reaction On Neelam Gorhe Statement: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाबाबत अत्यंत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे य़ांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटामध्ये एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागतात, असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यावर आता खुद्द राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या क्रायक्रमात बोलाताना नीलम गोऱ्हे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

    त्या गयेगुजरे आहेत, त्यांच्यावर काय बोलायचे – उद्धव ठाकरे

    ही सगळी गयीगुजरी लोक आहेत. त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं करुन घेतलं आहे. त्या महिला आहेत त्यावर मी काही बोलणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मर्सिडीजमधून फिरणाऱ्या लोकांना विचारा लाडक्या बहिणींना पैसे का नाही मिळाले? असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी केला.स्वतः मर्सिडीजमधून फिरत आहेत, मग लाडक्या बहिणी का उपाशी राहिल्या? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना टोलाही लगावला आहे.

    संजय राऊतांकडून गोऱ्हेंवर हल्लाबोल

    तसेच, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नीलम गोऱ्हेंना सुनावलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे ४ वेळा आमदार केलं आहे. त्यांनी किती मर्सिडिज दिल्या आहेत? महिला आघाडीचा विरोध असताना त्यांना उद्धव ठाकरेंनी आमदार केलं. त्यांनी ८ मर्सिडिज दिल्यात का, असेल तर त्यांनी त्याच्या पावत्या वगैरे घेऊन याव्या, असं म्हणत संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंवर हल्लाबोल केला आहे.

    नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या होत्या?

    २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आम्हालाही धन्य वाटलं होतं. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला होता. पण, आम्हाला हे माहित नव्हतं की आमदारांनाही भेटी मिळणार नाहीत. कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाहीत. दिवसातून दोन ते तीन वेळा आरटीपीसीआर केली तरी भेट नाही. या गोष्टीचा विचार केल्यावर स्थित्यंतर होतात यामागे अनेक गोष्टी असतात असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed