• Tue. Mar 10th, 2026
    मुलीच्या मागे का लागतो? तरुणाला भररस्त्यात चाकूने भोसकलं, तरुणाच्या मृत्यूने एकच खळबळ

    Nanded Crime News : नांदेडमध्ये एका तरुणाची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या मागे का लागतो? यावरुन झालेला वाद तरुणाच्या जीवावर बेतला आहे.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : आमच्या मुलीच्या मागे का लागतो म्हणून एका २१ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. शेख आराफत शेख महेबूब असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी १५ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आहेत. या आरोपींमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. या घटनेने हदगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

    मृत तरुण शेख अराफत हा हदगाव शहरातील खुदबई नगर परिसरात राहतो. तो परिसरातील एका तरुणीच्या मागे लागत होता. ही बाब समजल्यानंतर दोन दिवसांपूर्वी काही जणांनी शेख अराफत याला धमकी दिली होती. आमच्या मुलीपासून दूर रहा, अन्यथा जीवे मारतो, अशी धमकी देखील तरुणाला देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी शेख अराफत हा घरी परतत असताना त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
    कल्याण – डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला, सकाळीच्या वेळी भरगर्दीत काय घडलं?
    राम्या, पम्या, साहेबराव काळे, कृष्णा काळे, संजय खानजोडे यांनी त्यांच्याकडील चाकूने तरुणावर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना शेख अराफत याचा मृत्यू झाला. मृत तरुणाची आई मुबीनाबी शेख महेबूब यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात राम्या संभा काळे, पम्या संभा काळे, साहेबराव काळे, कृष्णा काळे, संजय खानजोडे, प्रदीप पंडित, सीमा काळे, वंदना काळे, जिजाबाई मस्के, प्रियंका काळे, वत्सला काळे, ओमकार काळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), १८९ (२), १९०, १९१ (२), १९१ (३), १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    लहानपणी आई-वडिलांची हत्या डोळ्यांसमोर पाहिली, ३४ वर्षांनी घेतला बदला; IT इंजिनिअरने एकाच कुटुंबातील ५ जणांना संपवलं

    मुलीच्या मागे का लागतो? तरुणाला भररस्त्यात चाकूने भोसकलं, तरुणाच्या मृत्यूने एकच खळबळ

    आरोपींमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरीत पाच जण फरार असल्याची माहिती आहे. न्यायालयाने दहा आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेनंतर खुदबईनगर येथे दगडफेकीची घटना घडली होती. परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या घटनेने हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed