Nagpur Fire Incident : नागपूरातील एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. एका खाजगी स्फोटक कंपनीत हा स्फोट झाला आहे. यात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
एशियन फायर वर्क्स नामक कंपनीत ही आग लागली. या कंपनीत फटाके बनविण्यात येतात. आग इतकी भीषण होती की, कंपनीचा काही भाग जळून खाक झाला आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे परिसरातील जंगलापर्यंत देखील ही आग फोफावली. तर सुमाके २० किलोमीटरपर्यंत स्फोटांचे हादरे बसले आहेत. कंपनीतील छप्पर मजूरांवर निखळल्याने त्यांनी जीव गमावला आहे. मुनिश मडावी (वय ३४, रा. मंडळा, मध्यप्रदेश) आणि भुरा लक्ष्मण रजाक (वय २५, रा. सिवनी, मध्यप्रदेश) अशी मृत मजुरांची नावे आहेत. तर घनश्याम लोखंडे व सोहेल शेख, अशी जखमींची नावे आहेत.
‘चेंगराचेंगरीनंतर रुग्णालयात मृतदेहांचा खच,’ अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर; घटनेचा थरार शमेना
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल व आरोग्य सेवा टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, कंपनीतील सामान आगीत जळून खाक झाले आहे. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. तर या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

