• Thu. Jun 11th, 2026
    महिला १० दिवसांपासून बेपत्ता, पार्किंगवाल्यावर संशय अन् नर्सची विवस्त्र अवस्थेतील बॉडी

    Chhatrapati Sambjhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका परिचारिकेची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने हत्या केल्यानंतर मृतेदह शेतात पुरला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    छत्रपती संभाजीनगर: गेल्या १० दिवसांपासून एक महिला बेपत्ता होती. अखेर पोलिसांनी या बेपत्ता महिला प्रकरणाचा छडा लावला आहे. यावेळी एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर येथे एका तरुणाने विवाहित महिलेची हत्या करुन तिला विवस्त्र करत तिचा मृतदेह पुरला. गेल्या ६ फेब्रुवारीपासून ही महिला बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत होते. पण तिचा काही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) पोलिसांनी या घटनेचं गूढ उकललं आहे. प्रियकरानेच या विवाहित महिलेची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मोनिका असं या विवाहितेचं नाव आहे.

    मोनिका या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान भारत या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. त्या जालना येथे राहत होत्या. त्या दररोज कामानिमित्त संभाजीनगर येथे ये-जा करायच्या. त्यासाठी त्या रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकीने यायच्या. रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये त्या आपली गाडी पार्क करायच्या. यादरम्यान त्या पार्किंगमध्ये काम करणाऱ्या इरफान शेखसोबत त्यांची ओळख झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या वर्षभरापासून यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. हे दोघे तासनतास फोनवर बोलायचे, अशी माहिती आहे.

    ६ फेब्रुवारीला मोनिका या नेहमीप्रमाणे संभाजीनगर येथे कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. पण, रात्री त्या घरी परतल्याच नाहीत. त्यामुळे मोनिका यांच्या आईने पोलिसांत धाव घेतली आणि त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तब्बल १० दिवस मोनिका यांचा शोध सुरु होता.

    यादरम्यान, पोलिसांना इरफान शेख याच्यावर संशय आला. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं. जेव्हा पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने या हत्येची कबुली दिली. आरोपी शेखने मोनिका यांना लासूर येथील आपल्या शेतात नेलं आणि तिथेच त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने शेतातील एका पडक्या खोलीत विवस्त्र करुन मोनिकाचा मृतदेह पुरला.

    पोलिसांच्या तपासात शेखने मोनिकाच्या हत्येची कबुली दिली. तसेच, तिची हत्या करुन तिला कुठे पुरलं हेही सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोनिका यांचा मृतदेह ताब्यात घेतला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांची नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक – महासंवाद
    विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    राज्यात मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ; शंभर टक्के पूर्ततेसाठी पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन – पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed