काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या अनेक नावे चर्चेत आहेत. असं असलं तरी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांवर वरचढ ठरत बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत पक्षाच्या हायकमांडकडे अनेक दिग्गज नेत्यांचे पर्याय आहेत. यामध्ये कोल्हापूरचे डॅशिंग नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार विश्वजीत कदम अशा अनेक दिग्गज नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होती. पण या सर्व नेत्यांपेक्षा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे वरचढ ठरल्याची चर्चा आहे.
हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत?
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. त्यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे. हर्षवर्धन सपकाळ हे 2014 ते 2019 या काळात बुलढाणा मतदारसंघाचे आमदार होते. तसेच ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
पडद्यामागे खुसूरफुसूर, शिंदेंच्या शिलेदारांनी घेतली शरद पवारांची भेट, नव्या राजकीय समीकरणाचे संकेत?
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभागी होत असतात. याशिवाय सपकाळ हे गांधी परिवाराचे जवळचे मानले जातात. त्यांना आगामी काळात पक्षश्रेष्ठींकडून मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

