महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्या मोठा दिवस आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का? ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे हे उद्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देखील उपस्थित असणार आहेत. कारण शरद पवार हे या वर्षाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.
तानाती सावंत यांचा मुलगा सापडला? पुणे पोलिसांकडून मोठी अपडेट
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन होणार
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं नेहमी कौतुक होत आलेलं आहे. महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती लाभली आहे. विधानसभेत किंवा निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडणारे राजकीय विरोधक विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र येतात. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांचा आदर राखून भाषण केलं जातं. अर्थात एकमेकांना मिश्किलपणे टोले लगावण्याचा कार्यक्रम भाषणांमधून पार पडतो. पण तो विषय थट्टा मस्करीपर्यंतच मर्यादीत असतो. उद्या देखील अशाच प्रकारचं राजकीय संस्कृतीचं दर्शन दिल्लीत बघायला मिळणार आहे.

