Beed Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाले आहेत. काल रात्री संपूर्ण मस्साजोग गाव एकत्र जमलं आणि त्यावेळीही मोठा आक्रोश पाहायला मिळाला. याप्रकरणी बोलताना धनंजय देशमुख हे अत्यंत भावूक झाले.
हायलाइट्स:
- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण
- गावात संतापाचं वातावरण, एकत्र येत केला आक्रोश
- किती धीर धरणार म्हणत धनंजय देशमुख भावूक
जर लोकांनी धीर दिला नसता तर इतकं लढू शकलो नसतो. सर्वसामान्य माणूस आहे, कुठे गेलो असतो, कसं लढलो असतो. जर लोकांनी धीर दिला नसता तर संपून गेलो असतो. या दु:खातून वर येऊ शकलो नसतो.
तपास सुरु आहे. तो पूर्ण झाल्याशिवाय त्यावर बोलणं चुकीचं आहे. त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कृष्णा आंधळेपासून आम्हाला आमच्या गावाला धोका आहे. जी घटना घडली ती धमकी वजा इशारा नाही तर त्यांनी ते करुन दाखवलं. त्यासाठी मी पोलिसांकडे विनंती केली आहे.
गुन्हा घडल्यानंतरही या गुन्हेगारांना कुठलीही भीती नव्हती. विषेशकरुन घटना घडल्यानंतर साडे दहावाजेपर्यंत या सगळ्या आरोपींचे मोबाईल सुरु होते. आम्ही डिव्हायएसपींना वारंवार विनंती करत होतो. सांगत होतो हे नंबर आहे, यांना कॉल करा, लोकेशन ट्रेस करा, यांनी पकडलं नाही. आमचं आंदोलन यांना फक्त बंद करायचं होतं. सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप मोठ्या चुका केल्या आहेत. नाहीतर यातील कोणीही वाचलं नसतं, सर्वांना अटक झाली असती, असं म्हणत धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला.

