Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला हादरा दिला
संजय शिरसाट यांचा ठाकरे गटाला झटका
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला हादरा देऊन, माजी महापौर, शिवसेना ठाकरे पक्षाचे मराठवाडा सचिव व काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला, पश्चिम मतदारसंघात पक्ष संघटनेची स्थिती भक्कम करण्याचा शिरसाट यांनी प्रयत्न केला.
हेही वाचा – Delhi Election Result Updates In Marathi
ठाकरेंचे दहा माजी नगरसेवक शिवसेनेत
मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी ठाकरे पक्षाला धक्का दिला. या मतदारसंघातील ठाकरे पक्षाचे दहा माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. या वेळी खासदार संदीपान भुमरे, शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, हृषीकेश जैस्वाल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विश्वनाथ राजपूत यांनी प्रवेश सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
Vasant More : आता लावा ताकद! इकडे ६ खासदार पक्ष सोडण्याची चर्चा; ठाकरेंनी झटक्यात ‘भाकरी फिरवली’, खास माणसावर जबाबदारी
शिवबंधन सोडणाऱ्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश?
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये स्थायी समितीचे माजी सभापती मोहन मेघावाले, माजी सभागृह नेते किशोर नागरे यांचा समावेश आहे. माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, रूपचंद वाघमारे, स्वाती नागरे, ज्योती वाघमारे, मीना गायके, ज्योती पिंजरकर, सीमा खरात यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
Uddhav Thackeray : इकडे ठाकरेंच्या हस्ते ‘शिवबंधन’ पुस्तकाचं प्रकाशन, तिकडे शिवबंधन सोडून दहा जणांचा ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश
Delhi Election Results : ‘आप’च्या फुग्याला टाचणी, केजरीवाल-अतिशी सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर, २५ जागी ‘कमळ’
इकडे ‘शिवबंधन’चं प्रकाशन, तिकडे ‘वर्षा’वर पक्षप्रवेश
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘शिवबंधन’ या कार्यअहवालाचे प्रकाशन मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत असतानाच ‘वर्षा’ बंगल्यावर ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत होता.

