• Mon. Mar 16th, 2026
    नंदुरबारमध्ये GBSचा शिरकाव, अकरा वर्षीय चिमुकलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

    Nandurbar GBS News : जीबीएस अर्थात ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराने आता नंदुरबारमध्ये शिरकाव केला आहे. या आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळले होते. यामध्ये अकरा वर्षीय बालिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

    Lipi

    महेश पाटील, नंदुरबार : जीबीएस अर्थात ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराने आता नंदुरबारमध्ये शिरकाव केला आहे. या आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळले होते. यामध्ये अकरा वर्षीय बालिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. बालिका व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पण नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

    सध्या राज्यभरात जीबीएस आजाराचे थैमान सुरू आहे. पुण्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या आजाराचे लोण पसरले आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जीबीएसच्या एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. या बालिकेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
    Coins In Stomach: तरुणाला वेदना असह्य, डॉक्टरांकडून लगेच ऑपरेशन; पोटात सापडली ३३ नाणी अन् समोर आली भयानक कहाणी
    अक्कलकुवा तालुक्यातील दोन संशयित रुग्णांना २५ जानेवारीला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी अकरा वर्षीय बालिकेच्या अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा आजार करोनासारखा संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर खबरदारी घ्याव, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

    आरोग्य विभागाची सतर्कता

    जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे जिल्हा रुग्णालयात प्रौढांसाठी वीस तर लहान मुलांसाठी चार आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. ज्या गावातून हे रुग्ण आढळले आहेत. त्या ठिकाणचे पाण्याची तपासणी देखील केली जाणार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed