• Mon. Sep 21st, 2026

IIT Bombay Student Death Case : आयआयटी मुंबईतील अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येने संस्थेतील शैक्षणिक वातावरण, परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांवरील ताण हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

आयआयटी बॉम्बे विद्यार्थी मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आयआयटी मुंबईत शुक्रवारी एका विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर संस्थेचे संचालक व विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता यांना अटक करण्याची मागणी विद्यार्थ्याच्या पालकांनी लावून धरली. अखेर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करून सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत तपास करण्याची ग्वाही दिल्यानंतर अखेर सात तासांनंतर पालकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

नेमकी घटना काय?

आयआयटी मुंबईतील अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येने संस्थेतील शैक्षणिक वातावरण, परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांवरील ताण हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. विद्यार्थ्याच्या मृत्यूला संस्थेतील काही अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले होते. त्यातच पालकांनी शनिवारी आयआयटी मुंबईच्या परिसरात आंदोलन केले. त्यांच्या तक्रारीवरून संस्थेतील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पालकांना दुपारी दीडच्या सुमारास घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतरही त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला.

Maharashtra TimesDevendra Fadnavis: पेट्रोल पंपांच्या UPI शुल्क विरोधावर फडणवीसांचा पलटवार; ‘यूपीआयमुळे व्यवसाय वाढला, नाममात्र शुल्कालाही विरोध नको’

‘मृतदेह ताब्यात घेणार नाही’

‘मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही’, अशी भूमिका पालकांनी घेतली. त्यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी राजावाडी रुग्णालयात धाव घेतली. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त धनंजय कुलकर्णी आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे संयुक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. मात्र, पालक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यांचे वकील निखिल कांबळे यांच्या मदतीने त्यांनी पोलिसांसमोर विविध मागण्या मांडल्या. अखेर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यासह अन्य मागण्यांबाबत पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर सात तासांच्या तणावपूर्ण घडामोडींना पूर्णविराम मिळाला. शनिवारी सायंकाळी ते मुलाचा मृतदेह घेऊन यवतमाळमधील मूळ गावी रवाना झाले.

संयुक्त आयुक्त नेमणार समिती

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून केला जाणार असून, सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास होणार आहे. तपासात सहभागी होण्यासाठी सहपोलिस आयुक्त स्वतंत्र समिती नेमणार आहेत. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यास त्याला विरोध करावा, कुटुंबीयांना कायदेशीर मदत द्यावी, आरोपींच्या बाजूने जाणाऱ्या न्यायालयीन आदेशांना आव्हान द्यावे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नुकसानभरपाई द्यावी आणि विशेष न्यायालयात खटला जलदगतीने चालवावा, अशा मागण्याही पालकांनी केल्या. पोलिसांनी या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Maharashtra TimesCrime News: इंजिनिअरिंगचा विद्यार्थी झटपट श्रीमंत व्हायला गेला अन् अडकला; गंभीर प्रकरणाचा भांडाफोड, दोघांना अटक

तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला

विद्यार्थ्याला संस्थेच्या परिसरात जातीय भेदभाव आणि मानसिक दबावाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता सूर्यनारायण दुल्ला यांच्यासह संस्थेतील अन्य अधिकाऱ्यांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याने यापूर्वीही संस्थेतील भेदभाव आणि अडचणींबाबत पालकांशी बोलल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल, असे सांगून आपण त्याला संयम राखण्याचा सल्ला दिला होता, असेही पालकांनी नमूद केले. या प्रकरणात आयआयटी मुंबईतील प्राध्यापक किंवा अधिकाऱ्याचे नाव विद्यार्थ्याच्या मृत्यूसंदर्भातील गुन्ह्यात प्रथमच नोंदवण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

संस्थेचे आवाहन

आयआयटी मुंबईने निवेदनाद्वारे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जाईल, तसेच कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा आणि तपास पूर्ण होईपर्यंत तर्कवितर्क टाळावेत, असे आवाहन संस्थेने केले आहे. संस्थेच्या अनुसूचित जाती-जमाती विद्यार्थी व कर्मचारी कक्षाने संबंधित विद्यार्थ्याने जातीय भेदभावाबाबत कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचे म्हटले आहे. या प्रवर्गातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कक्ष कटिबद्ध असून, जातीय भेदभावाबाबत तक्रार आल्यास त्यावर कार्यवाही केली जाईल, असेही कक्षाने स्पष्ट केले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा