• Sat. Jun 6th, 2026

    पोटच्या लेकीनेच बापाला फसवलं; ५ कोटी कर्जाचे आमिष, दागिने मोडून दिलेले पैसे, पण घडलं काही वेगळंच…

    पोटच्या लेकीनेच बापाला फसवलं; ५ कोटी कर्जाचे आमिष, दागिने मोडून दिलेले पैसे, पण घडलं काही वेगळंच…

    Nagpur Crime: आयुर्वेदिक औषधांच्या व्यवसायासाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने पोटच्या मुलीने साथीदारांच्या मदतीने वडिलांना ५० लाखांनी गंडा घातला.

    महाराष्ट्र टाइम्स
    Money Fraud.

    म.टा.प्रतिनिधी, नागपूर: आयुर्वेदिक औषधांच्या व्यवसायासाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने पोटच्या मुलीने साथीदारांच्या मदतीने वडिलांना ५० लाखांनी गंडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

    मीना गाडेकर (रा. खामगाव रोड, बाळापूर, जि.अकोला), अभय पाटील (तिरंगा चौक, इस्मालपूर, जि. सांगली), मनीषभाई पुरुषोत्तमभाई उमेरठिया (रा. सुरत, गुजरात) समाधान विठ्ठलराव कसबे, प्रतिभा कसबे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महादेव भीमाजी दुधे (वय ८०, रा. शाहाकार लेआउट, वानाडोंगरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मीना ही महादेव दुधे यांची मुलगी आहे. दुधे हे एमएसईबीमध्ये विभागीय लेखापाल होते. मे २०२२मध्ये मीना ही आपल्या माहेरी म्हणजेच दुधे यांच्या घरी आली.
    नाग नदीला २९५ कोटींचे बळ! केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद, गेल्यावर्षी मिळाले होते ५०० कोटी
    ‘मी सुरतमधील साई फायनान्स कंपनीत काम करते. कंपनीत रक्कम गुंतविल्यास अधिक नफा मिळेल. कंपनीत ५० लाख रुपये गुंतविल्यास ५ कोटी रुपये मिळतील’, असे आमिष तिने वडिलांना दाखविले. दुधे यांच्या मुलाला आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय करायचा असल्याने त्यांना पैशाची गरज होती. मुलीनेच सांगितल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर मीना व अन्य चौघांनी दुधे यांची भेट घेतली, त्यांचा विश्वास संपादन केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed