• Sun. Mar 15th, 2026

    Raj Thackeray : थोरात पडलेच कसे? अजितदादांचे ४२ आमदार कसे निवडून आले? भूमिका बदलण्यावर राज ठाकरेंची तोफ धडाडली

    Raj Thackeray : थोरात पडलेच कसे? अजितदादांचे ४२ आमदार कसे निवडून आले? भूमिका बदलण्यावर राज ठाकरेंची तोफ धडाडली

    MNS Raj Thackeray Speech : विधानसभा निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीरपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मनसेचा वरळीमध्ये आज राज्यस्तरीय मेळावा सुरू असून राज ठाकरेंनी निकालावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना जोरदार बॅटींग केली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्रात निकाल लागल्यावर सन्नाटा पसरला होता. १४००० लोकांच्या गावातून फक्त राजू पाटील यांनाच मतदान झालं होतं, यावेळी एकही मतदान झालं नाही. अजूनही निवडून आलेल्यांना विश्वास बसत नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले, आठवी टर्म होती. सातवेळा सत्तर हजार मतांनी निवडून यायचे ते या निवडणुकीमध्ये १० मतांनी पराभव होतो. चार ते पाच जागा येतील की नाही असं सर्वांना वाटत असताना अजित पवार ४२ कोणाचा तरी विश्वास बसेल का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

    जे इतकी वर्षे महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावर अजित पवार, भुजबळ मोठे झाले त्या शरद पवारांना १० जागा मिळतात. हे न समजण्यापलीकडची गोष्ट आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीला काँग्रेसचे सर्वाधिक १३ खासदार निवडून आले. एका खासदाराखाली साधारण ६ आमदार येतात, सर्वसाधारपणे काँग्रेसचे तीन खासदार यायला पाहिजे होते त्यांचे १५ आमदार येतात. शरद पवारांचे ८ खासदार निवडून आलेत त्यांचे १० आमदार येतात. लोकसभेला अजित पवारांचा १ खासदार निवडून आला तिथे ४२ आमदार निवडून येतात. चार महिन्यात लोकांच्या मनात फरक पडला, काय झालं आणि कशामुळे झालं हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावरती जाऊ नका फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही कुठेही मनात धरू नका की लोकांनी मतदान केलं नाही, लोकांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या. कोणी कुठच्य गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    ज्या गोष्टी पक्षाने तुम्हाला सांगितल्या आणि केल्य त्या गोष्टी सतत लोकांसमोर मांडल्या पाहिजेत. मला चार लोकांनी प्रश्न विचारल्यावर भांबावून जाणं हे काही चांगलं लक्षण नव्हे. मी काही गोष्ट आणल्यात ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. जाणीवपूर्वक केलेला प्रचार असतो, तिथे जर तुम्ही खमके नसाल तर उत्तर काय देणार आहेत. काही पत्रकार हे पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत. तेच या गोष्टी सांगत असतात आणि लिहित असतात. त्यामधील महत्त्वाचा भाग म्हणजे, राज ठाकरे भूमिका बदलतात. पदाधिकाऱ्यांनी मला हा प्रश्न केला म्हणजे भूमिका बदलल्या म्हणजे काय असतं त्यांना विचारलं, १९५२ ला निवडणुक झाली त्यावेळी नुकताच आरएससचा पॉलिटिकल विंग जन्माला आली तिचं नाव जनसंघ. आणीबाणी आणल्यानंतर ७७ ला निवडणुका झाल्या. तेव्हा इंदिरा गांधींचा पराभव झाला. १९८० ला परत इंदिरा गांधी विजयी झाल्या. त्यावेळेला जनसंघातून बाहरे पडलेल्यांची भारतीय जनता पार्टी झाली. जो आडवा झेंडा होता तो उभा केला. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी अध्यक्ष झाले त्यांनी पक्षाची भूमिका बदलत गांधीवादी समाजवाद यापुढे पाळी ही भूमिका घेतली. यादरम्यान १९७८ ला एक निवडणूक झाली, पवार मुख्यमंत्री झाले. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले ते प्रकरण, तेव्हा शरद पवारांनी पुलोद स्थापन केलेली. हाच जनसंघ शरद पवारांसोबत होता, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed