• Thu. Feb 20th, 2025 8:25:36 PM

    Saif Ali Khan: नोकरी गेली, लग्न मोडले…; सैफवरील हल्ल्यामुळे ‘या’ तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त

    Saif Ali Khan: नोकरी गेली, लग्न मोडले…; सैफवरील हल्ल्यामुळे ‘या’ तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त

    सैफवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद शरीफुल याला अटक केली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र या हल्ल्यामुळे एका तरुणाची नोकरी गेली, लग्नही मोडले आहे. त्याच्या जीवनाची वाताहत झाली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: १६ जानेवारीला अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला.मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. ६ दिवसाच्या उपचारानंतर सैफ रुग्णालयातून घरी परतला आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र या हल्ल्यामुळे एका तरुणाची नोकरी गेली, लग्नही मोडले असून त्याच्या जीवनाची वाताहत झाली आहे.
    सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर पोलिसांनी संशंयित म्हणून अटक केलेल्या एका व्यक्तीने आपल्या जीवनाचं गेल्या काही दिवस होत्याचं नव्हत कस झाले हे सांगितले. एका तरुणाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची नोकरी गेली आणि लग्नही मोडले. त्याच्या कुटुंबाला बदनामीचा सामना करावा लागत आहे.

    मुख्य आरोपी असल्याचा दावा आणि कुटुंबाला धक्का
    ३१ वर्षीय आकाश कनोजिया या वाहनचालकाला मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार १८ जानेवारीला छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावर पोलिसांनी अटक केली.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हल्ल्यातील आरोपी शरीफुल मोहम्मद याला अटक केली गेली. त्यामुळे आरपीएफने आकाशला सोडले. आकाश म्हणाला की, “जेव्हा माध्यमांनी माझे छायाचित्र दाखवणे सुरू केले आणि दावा केला की मी या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यावेळी माझ्या कुंटुंबाला धक्का बसला त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले. मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे माझे पुर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. मला मिशा आहेत हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीला नाही पाहिले.”

    नोकरी गेली, लग्न मोडले
    आकाशने सांगितले की “पोलिसांनी सोडल्यानंतर जेव्हा मी माझ्या कामावरील मालकांना फोन केला. त्यावेळी त्यांनी मला कामाला येऊ नको म्हणून सांगितले. त्यांनी माझे म्हणणे ऐकण्यासही नकार दिला. माझ्या आजीने सांगितले की, मला ताब्यात घेतल्यानंतर माझ्या होणाऱ्या बायकोच्या घरच्यांनी पुढील बोलणी करण्यास नकार दिला.”

    सैफच्या बिल्डिंग खाली उभे राहून नोकरी शोधण्याचा विचार
    कनोजियाने सांगितले की, “माझ्यावर खटले सुरू आहेत याचा हा अर्थ नाही की मला अशा रितीने संशयित म्हणून पकडले जावे. मी आता सैफच्या बिल्डिंग खाली उभे राहून नोकरी शोधण्याचा विचार करत आहे. कारण त्याच्याबरोबर जे झाले त्यामुळे मी सर्व काही गमावले आहे.देवाची कृपा आहे की दुर्ग रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतल्यानंतर काही तासातच आरोपी शरीफुलला अटक केली गेली. नाहीतर कोणास ठाऊक, मलाच या प्रकरणात आरोपी म्हणून सादर केले गेले असते. आता मला न्याय हवा आहे.”

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed