Uddhav Thackeray On Amit Shah: जेवढे अंगावर याल तेवढे अंगावर वळ घेऊन दिल्लीत परत जाल, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुरुवारी इशारा दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अमित शहा, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. ते म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी जो काही निकाल लागला, तो मला पटला नाही असे सांगत जिथे औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शहा ‘किस झाड की पत्ती’ आहे अशी घणाघाती टीका ठाकरेंनी शहांवर केली. लोकसभेनंतर आपण भ्रमात राहिलो हे आपण सत्य मान्य करायल हवे. ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा अपप्रचार भाजपने केला.
रेल्वेतून उजवीकडे उतरलेले चिरडले गेले…; कुटुंबातील सदस्य गमावलेल्या तरुणाने सांगितला मृत्यूचा थरार
मुंबईतील दंगलीसाठी मी मुस्लिम धर्मियांची माफी मागितल्याचाही कांगावा करण्यात आला. मात्र माफी मी नाही, तर अटलबिहारी वाजपेयींनी मागितली होती. इट वॉज टेरिबल मिस्टेक असे लालकृष्ण अडवाणी बोलले होते. त्यामुळे आता शहांनी याबाबत अडवाणींनी विचारावे, असेही ते म्हणाले. वांद्र्याला गद्दाराचा मेळावा सुरू आहे. गद्दार जिंकले असले तरी महापालिका निवडणूक होऊन जाऊ द्या, मग गद्दारांना त्यांची जागा दाखवली जाईल, अशी टीका एकनाथ शिंदेंवर केली.
Bacchu Kadu: शरद पवार, उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत जातील; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
‘तुमची जागा काय होती, हे पाहा’
‘माझी जागा ठरवताना, तुमची जागा काय होती, त्यातून बाळासोहबांनी कसे बाहेर काढले, हे पाहा,’ असेही उद्धव शहा यांना म्हणाले. भाजपने गुजरातमधून ९० हजार लोक आणल्याचे विधान पंकजा मुंडे यांनी केले होते. यावर ‘ते लोक कुठे गेले आहेत ते विचारा,’ असा टोला त्यांनी लगावला