वाल्मिक कराड आणि बीडचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.वाल्मिक कराड हे सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका असे बल्लाळ यांना सांगत असल्याची ऑडिओ क्लिप आहे.यावर बल्लाळ हे त्याची शिफारस करू नका तुम्ही एसपी साहेबांना बोला असे म्हणतात.ही ऑडिओ क्लिप खोटी आहे, सनी आठवले हा गुन्हेगार आहे असं शितलकुमार बल्लाळ यांनी म्हटलंय.ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही, याप्रकरणी मी गुन्हा दाखल करणार आहे असं बल्लाळ म्हणाले.