Produced byविश्रांती शिंदे | Contributed byनयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम23 Jan 2025, 7:22 pm
कोणताही सण असो वा समारंभ… अंगावर पारंपारिक कपडे आणि पायात कोल्हापुरी पायतान असलं की प्रत्येकाचा रुबाब वाढलेलाच असतो बरं का… राजकीय पुढार्यांपासून सिनेसृष्टीतील कलाकारांपर्यंत या कोल्हापुरी पायतानची भुरळ प्रत्येकाला असते. अस्सल चामड्याची आणि हाताने तयार केलेली कोल्हापुरी पायतान ही राज्यातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी पायतानाववर केलेल्या कलाकुसरीमुळे तिला आलेलं सौंदर्य हे अधिकचं खुलतं… मात्र ही कोल्हापुरी चप्पल कशी तयार होते? त्यामध्ये काय वापरले जाते.. असा अनेकांना पडलेला प्रश्न आहे…. त्याचच उत्तर तुम्हाला या स्टोरीतून मिळेल….