Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधत दोन्ही गट गुरुवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शिवसेना उबाठाचा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे, तर शिंदे यांच्या शिवसेनेचा वांद्रे-कुर्ला संकुलात मेळावा होत आहे.
हायलाइट्स:
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार
- दोन्हींकडून जय्यत तयारी; अनेकांच्या पक्षप्रवेशाची शक्यता
- महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू
मुंबईकरांनो सावधान, प्लास्टिक बाळगल्यास भरावा लागेल ‘इतका’ दंड, पहिल्याच दिवशी ६१ किलो प्लास्टिक जप्त
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून प्रथमच सर्वसामान्य शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मध्यंतरी मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. मात्र, खुद्द उद्धव ठाकरे यांनी अद्याप महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक निकाल आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कोणती भूमिका मांडणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता स्थानिक निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शिंदे गटाच्यावतीने आज शिवोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमात शिंदे हे उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करण्याचे संकेत आहेत. या कार्यक्रमात ठाकरे गटातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन लाचखोर अधिकारी ACBच्या जाळ्यात; अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी मागितलेली लाच, प्रकरण काय?
पालिका निवडणुकीबाबत भूमिकेकडे लक्ष
शिंदेंची शिवसेना स्थानिक निवडणुका विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढणार असून त्यादृष्टीने एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी अद्याप महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणती भूमिका मांडणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.