• Tue. Jan 21st, 2025
    आधी कानशिलात लगावली, नंतर रस्त्यावर पाडून पती-पत्नीकडून तरुणीला बेदम मारहाण; धक्कादायक Video समोर

    Girl Beaten by Husband Wife : वर्ध्यात तरुणीला पती-पत्नीकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. तरुणी मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून संताप व्यक्त होत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    इक्बाल शेख, वर्धा : वर्ध्यात तरुणीला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्याच्या बुरांडे ले आऊट मधील या तरुणीला मारहाणीच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मोटरसायकलच्या वादातून पती-पत्नीकडून तरुणीला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मारहाण करणाऱ्या पती-पत्नीवर संताप व्यक्त होत असून टीका केली जात आहे.
    सोसायटीमध्ये अवैधरित्या मोटारपंप, वॉचमनने हात लावताच फेकला गेला; इमारतीमध्ये अनर्थ घडला

    पती-पत्नीकडून तरुणीला बेदम मारहाण

    व्हिडिओमध्ये दिसतंय, की रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची कार आणि बाजूलाच एक मोटरसायकल उभी आहे. तरुणी मोटरसायकलच्या बाजूला उभी असलेली दिसतेय. सुरुवातीला पती-पत्नी तरुणीशी भांडताना दिसतात. तेवढ्यात तो व्यक्ती तिच्या जवळ जात तरुणीच्या कानशिलात लगावतो. त्यानंतर तरुणीने देखील त्या व्यक्तीला विरोध केला. पतीने मारल्यानंतर त्या व्यक्तीची पत्नीदेखील तरुणीला मारहाण करू लागते.
    पुण्यातील बहीण-भाऊ केरळच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत; चिठ्ठी लिहून संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण समोर
    मारहाण करणारा व्यक्ती त्या तरुणीला दूर ढकलून देतो. रस्त्यावरील हा प्रकार पाहून जाणारे – येणारे काही जण भांडण सोडवण्यासाठी पुढे येतात. मात्र तो व्यक्ती त्यांनाही ऐकत नाही. या मारहाणीत तरुणीचा फोन खाली पडलेला दिसतोय. ती तरुणी फोन उचलून घेते. त्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी तरुणीला मारहाण करायला जाते. पत्नीनंतर पुन्हा तो व्यक्ती येऊन तरुणीला रस्त्यावर खाली पाडून तिला बेदम मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसतो आहे.
    Pune Crime : दुचाकीवरुन आले, एकामागे एक गोळ्या झाडल्या, भरदिवसा उद्योजकावरील गोळीबाराने पुणे हादरलं

    मारहाणीत तरुणी गंभीर जखमी

    या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तात्काळ वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर सेवाग्राम रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून तरुणीच्या नाकाचं हाडं फॅक्चर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    आधी कानशिलात लगावली, नंतर रस्त्यावर पाडून पती-पत्नीकडून तरुणीला बेदम मारहाण; धक्कादायक Video समोर

    तरुणीला मारहाण केलेल्या पती-पत्नीवर रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ३२५, ३४१, ५०४, ५०६ या कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला बेदम मारहाण करणारा व्यक्ती वर्ध्याच्या हिंदी विश्वविद्यालय येथील सुरक्षा रक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed