• Mon. Jan 20th, 2025

    Mumbai AC Local Train : मुंबईत धावणार २३८ एसी लोकल ट्रेन, रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

    Mumbai AC Local Train : मुंबईत धावणार २३८ एसी लोकल ट्रेन, रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

    Mumbai Local AC Train : मुंबईकरांच्या सेवेत आणखी एसी ट्रेन येणार आहेत. मुंबईत नव्या २३८ एसी लोकल ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. यासंदर्भात काम सुरू झाल्याचंही ते म्हणाले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच आणखी एसी ट्रेनची सुविधा देण्यात येणार आहे. मुंबईकरांना लवकरच एसी ट्रेन मिळणार असून केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आणि बेस्ट असतानाही लोकल ट्रेन ही मुंबईची लाइफलाइन आहे, १८ महिन्यांच्या विलंबानंतर पुन्हा मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेने काम सुरू झालं आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे.

    काय म्हणाले केंद्रीय मंत्री

    मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी एसी लोकल ट्रेनचे संकेत दिले आहेत. शनिवारी त्यांनी मुंबई बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना एसी ट्रेनबाबतही माहिती दिली. लवकरच मुंबईकरांच्या सेवेत एसी ट्रेन दाखल होणार असून याप्रकरणी काम सुरू झाल्याचं ते म्हणाले.
    Ghodbunder To Bhayandar Elevated Road : घोडबंदर ते भाईंदरपर्यंतची वाहतूक कोंडी सुटणार; एलिवेटेड रोड सुरू होणार? कसा असेल मार्ग?

    काय आहे योजना?

    केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितलं, की मुंबईत सध्या ३५०० लोकल सेवा आहेत. रेल्वेकडून येत्या काळात आणखी ३०० लोकल सेवा सुरू होणार आहेत. त्यासाठी १७,१०७ कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वे करणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये १.७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

    ‘हिंदुस्तान टाईम्स’ मधील वृत्तानुसार, जून २०२३ मध्ये मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) ने या प्रकल्पासाठी जागतिक निविदा काढल्या. मात्र, खरेदी रखडल्याने निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
    गोरेगाव – मुलुंड लिंक रोडमुळे वेळ वाचणार, कसा, कुठून असेल टनलचा मार्ग? कधीपर्यंत सुरू होणार?

    Mumbai AC Local Train : मुंबईत धावणार २३८ एसी लोकल ट्रेन, रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

    महाराष्ट्रात नुकतंच भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर हा प्रकल्प पुढे आला आहे. रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ योजनेनुसार, MUTP-3 चं उद्दिष्ट्य ३४९१ कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चात ४७ AC लोकल खरेदी करण्याचं आहे. तर MUTP-3A चं उद्दिष्ट्य १५.८०२ कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाने १९१ लोकल खरेदी करण्याचं आहे. त्यामुळे दोन्ही मिळून एकूण २३८ AC लोकल येत्या काळात सुरू होऊ शकतात. राजकीय हस्तक्षेपामुळे विलंब झाला होता, परंतु आता या प्रकल्पाला पुन्हा गती मिळताना दिसत आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed