Manoj Jarange Patil big warning : बीडच्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले, आम्ही कुठल्या जातीला समुदायाला कधीच टार्गेट केलं नाही किंवा राजकीय पदाचा आमचा विषय नाही. आमचा न्यायाचा विषय आहे, या राज्यात आज चित्र-विचित्र बघण्याची वेळ आली आहे. वाईट चित्र पाहण्याची वेळ मंत्री धनंजय मुंडेंच्या टोळीने आणली आहे. बीडमध्ये चाललेली गुंडगिरी, खून, छेडछाडी, दरोडे, खंडण्या मागून त्यातून खून करणे याविषयी आमचा रोष आहे आणि याला आळा बसावा अशी मागणी आहे. तर खंडणी आणि खुनातील आरोपी एकच असल्याचा आरोपही जरांगेंनी केला आहे. तर या प्रकरणात जेवढी साखळी असेल तिचा देखील नायनाट केला जाईल, असे देखील जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान जरांगेंनी बीडच्या पालकमंत्रीपदावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘पालकमंत्री पदावरून कुणाला वगळायचे आणि कुणाला नाही याचा सर्वस्व अधिकार सरकारला आहे. आमचा विषय न्यायाचा आहे आणि बीडमध्ये चाललेल्या चुकीच्या पद्धतीचा आहे. बीडमध्ये चाललेली गुंडगिरी, खून, छेडछाडी,दरोडे, खंडण्या मागून त्यातून खून करणे याविषयी आमचा रोष आहे.’