• Sun. Jan 19th, 2025
    जुना वाद जीवावर बेतला, संपूर्ण कुटुंबावर चाकू, कोयत्याने हल्ला; तरुणाच्या मृत्यूने जळगाव हादरलं

    Jalgaon Crime News : जळगावात टोळक्याकडून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून इतर कुटुंबिय गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    Lipi

    निलेश पाटील, जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात आता गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं आहे. असाच एक प्रकार समोर आला असून जिल्ह्यातील एका शिरसाट कुटुंबावर जुन्या वादातून काही टोळक्याने प्राण घातक हल्ला केला आहे. या हल्ल्याक २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही गुन्हेगारी थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

    जळगाव शहरात जुन्या वादातून घरातील कुटुंबावार चॉपर आणि कोयता अशा शस्त्रांनी प्राणघातक हल्ला झाला. यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुकेश रमेश शिरसाठ वय, २६ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर जखमी झालेल्या ५ जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
    बदलापूर पुन्हा हादरलं, ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; घाबरलेल्या चिमुकलीने पालकांना सांगितलं शेजारच्या दादाने…
    जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ या तरूणाचा काही महिन्यांपूर्वी परिसरातील इतर तरुणांशी वाद झाला होता. जुन्या वादातून शनिवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली होती. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिरसाठ कुटुंबावर सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठीने जीवघेणा हल्ला केला.
    आईसोबत ट्यूशनला निघालेली, मागून टिप्परने फरफटत नेलं; आईच्या डोळ्यासमोर चिमुकलीचा अंत, शहरात हळहळ
    या हल्ल्यात निळकंठ सुखदेव शिरसाट वय-४५, कोमल निळकंठ शिरसाठ, करण निळकंठ शिरसाठ वय-२५, ललिता निळकंठ शिरसाठ वय-३० आणि सनी निळकंठ शिरसाठ वय २१, सर्व रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.

    घटनेत मुकेश रमेश शिरसाठ वय-२६ या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. वैद्यकीय महाविद्यालयात मित्र परिवारासह नातेवाईकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसंच जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed