राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. नैतिकता असेल तर मुंडे राजीनामा देतील असा टोला रोहित पवारांनी लगावला. तर वाल्मिक कराडनेच बबन गित्ते यांना अडकवलं असल्याचा उल्लेखही यावेळी त्यांनी केला. रोहित पवारांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना बीडचे पालकमंत्री पद देण्यावरून देखील त्यांनी भाष्य केलंय. पुण्याप्रमाणे बीडकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.