शनिवारी महायुती सरकारमधील पालकमंत्र्यांचे वाटप झाले आणि धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला. अजित पवार बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मुंडेंना मंत्रीपद नाही दिले. सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देऊन त्यांनी पवारांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला.
अजित दादा पालकमंत्री झाल्याने अतिशय आनंद आहे. पालकमंत्री स्थानिकचा नको याची कारणं म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे महायुती झाली आणि त्याआधीची अडीच वर्षे जिल्ह्यातील लोकांना प्रचंड त्रास लोकांना झाला. पोलिसांच्या बाबतीत ते घरगडी असल्यासारखे काम करतायेतय. कायदा नावाची गोष्ट राहिलेली नाही. संतोष देशमुखसारखी क्रूर हत्या झाली, इथे जे पालकमंत्री होते त्यांनी पार्शियल काम केलेलं आहे. अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम करतील आणि सहा आमदारांपैकी चार आमदारांची ही इच्छा होती म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना संधी दिली. अर्थ खाते दादांकडे आहे, बीड जिल्ह्यासाठी मूठ थोडी ढिल्ली सोडावी. बीड जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो, असं सुरेश धस म्हणाले.
पंकजा ताईंकडे मागची पाच वर्षे पालकमंत्रीपद होतं, त्यांनी अतिशय चांगलं कांम केलं. पण त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांनी काही चुका केल्या. त्याचीच भीती वाटत होती, तेच कार्यकर्ते त्यांच जुन्या चुका असं काही होईल वाटत होतं. पण त्यांच्याबाबतीत थोडीशी नाराजी होती. पण भाड्याने दिलेलं पालकमंत्रीपद होतं त्याचा मात्र जास्त त्रास झाल्याच सुरेश धस यांनी सांगितलं.
आता चूक किंवा बरोबर याचा कसा निर्णय होईल, त्याला वेळ लागेल कारण चौकशी आता सुरू झाली. करूणा मुंडे परळीमध्ये आल्या होत्या, पत्रकार परिषद घेत होत्या. त्यावेळी कशाला आडवायचं, करूणा मुंडे वैजनाथाच्या दर्शनाला आल्या तेव्हा पोलीस तिथे बंदूक ठेवतायेत. सचिन सानप नावाचा पोलीस कॉन्स्टेबल, गोविंद भसाणे आणि भास्कर केंद्रे तिथे दिसत आहेत. आमच्या एसपींनी चौकशी लावली नाही माहिती नाही, पण मी आता यासंदर्भात पत्र देणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.