Crime News: एक तासापेक्षा अधिक काळ त्याचा पाठलाग केल्यानंतर गणेश चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतलं. पळत असताना गणेश चव्हाण याची गावठी पिस्तूल पोलिसांना सापडली. लातूर पोलिसांनी गणेश चव्हाण यास ताब्यात घेतलं त्याचवेळी, आंबेजोगाई भागातून आलेले पोलिसांचं पथक तिथे दाखल झालं पुढील कारवाई सुरू आहे.
बीड जिल्ह्याला लागून असलेल्या लातूर जिल्ह्यातील रेनापुर पोलीस यांना त्याबाबत माहिती मिळाली. गोविंद नगर शिवारात आरोपी आल्याचे समजताच शोधा शोध सुरू झाली. गणेश पंडितराव चव्हाण हा स्कुटी वरून गोविंद नगर शिवारात फिरत असल्याची माहिती मिळाली. आणि पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पोलीस मागावर येत असल्याचे लक्षात आल्यावर गणेश चव्हाण याने स्कुटी रस्त्यात टाकून शेतात पळ काढला. पोलिसांनीही शेतात त्याचा पाठलाग सुरू केला. एक तासापेक्षा अधिक काळ त्याचा पाठलाग केल्यानंतर गणेश चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतलं. पळत असताना गणेश चव्हाण याची गावठी पिस्तूल पोलिसांना सापडली. लातूर पोलिसांनी गणेश चव्हाण यास ताब्यात घेतलं त्याचवेळी, आंबेजोगाई भागातून आलेले पोलिसांचं पथक तिथे दाखल झालं पुढील कारवाई सुरू आहे.
गर्लफ्रेंडने दरवाजा न उघडल्यामुळे गोळीबार
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीशी प्रियकर गणेश पंडित चव्हाणचे (वय २४) प्रेमसंबंध होते. मात्र, गणेश चव्हाणच्या त्रासाला कंटाळून संबंधित युवतीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. यानंतर गणेश चव्हाणने युवती व तिच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच रागातून तो आंबेजोगाईमध्ये आला होता. यावेळी त्याने थेट युवतीच्या घरी जात तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून दरवाजा कोणीच न उघडल्याने गावठी कट्ट्याने, त्याने खिडकीतून गोळीबार केला. मात्र, यावेळी कुटुंबातील इतर मंडळी दुसऱ्या खोलीमध्ये असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी गणेश चव्हाणला अटक केली आहे. बीड जिल्ह्यामधील धक्कादायक घटनांमध्ये मालिका सुरुच आहे.