• Sat. Jan 18th, 2025
    ही घटना भीतीदायक; आरोपीला पकडण्यासाठी १० टीम सज्ज, लवकरच… आशिष शेलारांची मोठी माहिती

    Ashish Shelar on Saif Ali Khan : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोली, रुग्णालय आणि सैफच्या तब्येतीवर माहिती दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : बॉलिवूड नबाव सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच वाजता एका अज्ञाताकडून चाकू हल्ला करण्यात आला. सैफ आणि करिनाच्या घरात घुसलेल्या अज्ञातसोबत झालेल्या झटापटीत सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्या मध्यरात्री तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या संपूर्ण घटनेनंतर मंत्री आशिष शेलार यांनी सैफ अली खानची भेट घेतली. सैफच्या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    आपको क्या चाहिये? सैफच्या मेडचा सवाल, हल्लेखोराकडून एक कोटींची मागणी; FIRमध्ये मोठी अपडेट समोर

    काय म्हणाले आशिष शेलार?

    सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर आशिष शेलार म्हणाले, ‘हल्ला झाल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सैफला चाकू हल्ल्यात झालेल्या जखमांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. दोन ठिकाणी खोल जखमा झाल्या होत्या. त्यावर ४ ते ५ तास शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे. तो आयसीयूमध्ये विश्रांती घेत आहे. त्याच्यावर योग्य प्रकराचे उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीसाठी आवश्यक सर्व व्यवस्था रुग्णालयाने केली आहे’.
    सुटणार नाही सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर; ८० हून अधिक एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातात आहे तपास

    क्राईमच्या १० टीम आरोपीला पकडण्यासाठी तैनात

    पुढे ते म्हणाले, ‘पोलीस अधिकाऱ्यांशी सकाळपासून बोललो आहे. ही घटना गंभीर, भीतीदायक आहे. पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक पुरावे गोळा करणं सुरू आहे. आरोपीला पकडण्यासाठी माहिती गोळा करणं, हे काम तातडीने पोलिसांनी सुरू केलं आहे. पोलिसांच्या क्राईमच्या १० टीम त्याला पकडण्यासाठी तयार केल्या असून पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. आरोपी लवकर पकडला जाईल, त्याला अटक होईल अशी अपेक्षा आहे. तसंच सैफ अली खान लवकर बरे व्हावेत, आणि त्यांच्या जखमा बऱ्या व्हाव्यात, त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला असेल, ते यातून लवकरात लवकर सावरतील ही अपेक्षा करूया’, असं म्हणत त्यांनी सैफ अली खानच्या तब्येतीची माहिती दिली आहे.

    ही घटना भीतीदायक; आरोपीला पकडण्यासाठी १० टीम सज्ज, लवकरच… आशिष शेलारांची मोठी माहिती

    दरम्यान, सैफच्या मेडने दिलेल्या जबाबानुसार, हल्लेखोराने १ कोटींची मागणी केली होती. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झालं आणि नंतर सैफवर हल्लेखोराने हल्ला केला असल्याची माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed