• Sat. Jan 18th, 2025
    मित्राकडून आधी पत्नीवर अतिप्रसंग नंतर धमकी, संतापलेल्या पतीने मित्राला संपवलं; मृत्यूचा वेगळा बनाव रचला पण…

    Kalyan Crime News : बदलापुरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केल्याने मित्राने काटा काढला असल्याचे समोर आले आहे.

    Lipi

    प्रदीप भणगे, कल्याण : बदलापुरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केल्याने मित्राने काटा काढला असल्याचे समोर आले आहे. तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला आणि ही बाब पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली. यानंतर पतीने त्याच्या मित्राची हत्या केली. धक्कादायक म्हणजे मित्राचा फरशीवर पडून मृत्यू झाला असल्याचा बनावही तिच्या पतीने रचला. पण पोलिसांनी आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    वृत्तानुसार, बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती. मात्र सुशांतने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग केला आणि पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही तिला दिली. यानंतर पुढेही धमकावून त्याने तिच्यासोबत दुष्कृत्य केले. मात्र पत्नीने हिंमत करून नरेश याला सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली. यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे भासवत १० जानेवारीला सुशांतला घरी बोलावले होते. तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केले. त्या रात्री सुशांत हा नरेशच्या घरी मुक्कामी राहिला.

    पहाटेच्या सुमारास नरेश याने संतापाच्या भरात सुशांतच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली. पण त्याने अति दारू प्यायल्याने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला, असा बनावही नरेशने रचला. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र ज्यावेळेस सुशांत याच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले, त्यावेळेस नरेशची पोलखोल झाली.

    पोलिसांनी सांगितले की, सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाला, असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. आम्ही नरेशला ताब्यात घेतले आहे. नरेशकडे चौकशी केली असता त्याने आपणच सुशांत याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आपल्या पत्नीसोबत दुष्कृत्य केल्याच्या रागातून त्याने सुशांतला मारले. तर याप्रकरणी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे तर त्याला अटक देखील करण्याच आल्याचे पोलिसांनी सांगितले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed