• Sat. Jan 11th, 2025
    संतोष देशमुख यांच्या हत्येतील खरा सूत्रधार सुरेश धसांनी सांगितला, म्हणाले..

    Santosh deshmukh murder case : धाराशिवमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी काही गंभीर आरोप करण्यात आली आहेत. आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक खुलासे केले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    धाराशिव : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. सतत गंभीर आरोप केली जात आहेत. बीडनंतर, पुणे, परभणी, पैठण, जालना आणि आता धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. देशमुख कुटुंबातील सदस्य, आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर हे देखील या मोर्चात सहभागी झाले. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठी मागणी केलीये. सर्व आरोपींवर मकोका लावण्याची मागणी करण्यात आलीये. संदीप क्षीरसागर यांनी परत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये.

    धाराशिवच्या मोर्चात बोलताना मोठी टीका आमदार सुरेश धस यांनी केलीये. यासोबतच त्यांनी काही आरोपही केले. गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी म्हटले की, सरपंच संतोष देशमुखला चार तास मारण्यात आले, त्यांना हाल करून मारण्यात आलं. गुन्हा दाखल करू नका म्हणणाराच मुख्य आरोपी असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले. पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, आकाचा आका पण बिनभाड्याच्या खोलीत गेला पाहिजे.
    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका; ‘त्या’ केसमुळे वाल्मिक कराडला दिलासायावेळी गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी म्हटले की, मारहाणीचा व्हिडीओ तयार करून आकाला दाखवण्यात आला. हे लोक भगवान बाबांचे नाव भाषणापुरते घेतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावा. तुम्हाला पैशांचा माज आलाय, अशाही टोला हा सुरेश धस यांनी लगावला.. यावेळी गंभीर आरोप करत सुरेश धस म्हणाले की, माणूस रडत होता आणि हे व्हिडीओ काढत होते. आका सांगत होता, मारा म्हणून.

    दीड कोटीसाठीच संतोष देशमुखची हत्या करण्यात आल्याचा दावा सुरेश धस यांच्याकडून करण्यात आलाय. आका म्हणतो माझा संबंध नाही पण तोच खरा मुख्य सूत्रधार असल्याचे धसांनी म्हटले. धाराशिवच्या भाषणात अनेक गंभीर आरोप आता सुरेश धस यांच्याकडून करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच संपूर्ण देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी बऱ्याच वेळ त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed