Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीच्या निधनानंतर पतीनेही १८ दिवसांनी आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. पती-पत्नीच्या निधनानंतर सात वर्षाच्या चिमुकला पोरका झाला आहे.
एकामागे एक पत्नी, पतीने संपवलं जीवन
बापूसाहेब सूर्यकांत चांदगुडे असं गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या पतीचं नाव आहे. तर १८ दिवसांपूर्वी बापूसाहेब यांची पत्नी शीतलने टोकाचं पाऊल उचललं होतं.
खेळता खेळता अनर्थ घडला, मित्रांची मस्ती चिमुकलीच्या जीवावर बेतली, तरुण अंगावर पडल्यानं २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
याप्रकरणी गिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथील बापूसाहेब चांदगुडे हे पती – पत्नी त्यांच्या सात वर्षाचा मुलगासह एकत्र राहत होते. दरम्यान १८ दिवसांपूर्वी बापूसाहेब चांदगुडे यांची पत्नी शितल हिने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे चांदगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
Washim News : मतिमंद मुलाने जन्मदात्याला संपवलं, नंतर मृतदेहाजवळच बसून राहिला; धक्कादायक कृत्याने खळबळ
पतीने नैराश्यात आयुष्य संपवल्याचा अंदाज
पत्नीच्या अचानक अशाप्रकारे जाण्याने पती बापूसाहेब हे नैराश्यात गेले होते. पत्नीच्या आत्महत्येला १८ दिवस झाले होते. या घटनेतून कुटुंब सावरत नाही, तोच पती बापूसाहेब चांदगुडे यांनी देखील राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. बापूसाहेब यांनी गळफास घेतल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी बापूसाहेब यांना तपासून मृत घोषित केलं. पत्नीच्या आत्महत्येनंतर नैराश्यामुळे पतीनेही आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे.
पत्नीने आयुष्य संपवलं, १८ दिवसांत पतीचाही टोकाचा निर्णय; ७ वर्षाच्या चिमुकला पोरका झाला
दरम्यान, शितल आणि त्यानंतर बापूसाहेब यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, वडील आणि या दांपत्याचा सात वर्षाचा एक चिमुकला असं कुटुंब आहे. कोवळ्या वयातच आई-वडिलांचं छत्र हरपल्याने चिमुकल्यासह त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेळण्या-बागडण्याच्या सात वर्षाच्या चिमुकल्याच्या डोक्यावरचं आई-वडिलांचा हात नियतीने हिरावून नेल्याने जिल्ह्यात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.