• Sun. Jan 19th, 2025

    Nashik News: उघड्या डीपीचा जोरदार शॉक; साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, नाशिकरोडमधील घटना

    Nashik News: उघड्या डीपीचा जोरदार शॉक; साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, नाशिकरोडमधील घटना

    Nashik News: सोमवारी दुपारी अफान खान हा बालक बारदान दुकानात काम करणारी आई उजमा यांच्यासोबत गेलेला होता. दुपारी एका लहान मुलीसोबत खेळता खेळता तो डीपीजवळ गेला.

    महाराष्ट्र टाइम्स
    afan khan

    म.टा.वृत्तसेवा, नाशिकरोड: उघड्या डीपीतील (मिनी पिलर) वीज प्रवाह सुरू असलेल्या तारांना धक्का लागून अफान नईम खान (वय साडेतीन वर्ष, रा. पवारवाडी, सुभाष रोड) या बालकाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता जियाउद्दीन डेपो भागात ही घटना घडली. या बालकाच्या मृत्यूच्या घटनेमुळे शहरातील झाकणे नसलेल्या डीपींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    मालधक्का रोडवरील जियाउद्दिन डेपो भागातील वजनकाट्याच्या जवळ रस्त्याच्या कडेला महावितरणची वीजपुरवठा करणारी डीपी (मिनी पिलर) आहे. सोमवारी दुपारी अफान खान हा बालक बारदान दुकानात काम करणारी आई उजमा यांच्यासोबत गेलेला होता. दुपारी एका लहान मुलीसोबत खेळता खेळता तो डीपीजवळ गेला. या डीपीला झाकण नसल्याने त्याने डीपीतील उघड्या तारांना स्पर्श केल्याने त्याला विजेचा जोरदार झटका लागला. त्याच्यासोबत असलेल्या लहान मुलीला शॉक लागला, मात्र सुदैवाने ती वाचली. घाबरल्याने ती रडू लागल्याने याकडे आजूबाजूच्या दुकानदारांचे लक्ष गेले. तोपर्यंत लहानगा अफान जोरात खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
    ओझरमध्ये विवाहितेनं संपवलं जीवन; सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, ७ महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न, नेमकं काय घडलं?
    जवळच्याच दुकानातील बबलू खान यांनी अफान यास तत्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. काही महिन्यांपूर्वी याच डीपीला तीन वर्षीय मुलाचा धक्का लागून त्याचे दोन्ही हात जळाल्याची घटना घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक अस्लम मणियार, समीर शेख आदींनी बिटको रुग्णालयात धाव घेत अफानच्या पालकांना धीर दिला. नाशिकरोड पोलिसांनी बिटको रुग्णालयात धाव घेत पंचनामा करून मृत अफानचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला.
    Nashik: ‘सिव्हिल’मधील बाळ चोरीचा १२ तासांत उलगडा, एमबीए महिलेचं कृत्य, कारण धक्कादायक
    ‘डीपी’ची झाकणे चोरणे ठरतेय जीवघेणे
    प्रत्येक डीपीला महावितरण झाकण लावते. परंतु, बहुतेक डीपीची झाकणे चोरटे चोरून नेतात. त्यामुळे डीपीला झाकणे राहत नाहीत. अशा डीपी शहरातील रस्त्यांच्या कडेला आणि रहिवासी भागात ठिकठिकाणी दिसून येतात. अशा डीपीपैकीच एक असलेली डीपी अफान खान बालकासाठी जीवघेणी ठरली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed